पंकजाताईचा लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल
मोठा भाऊ म्हणून मी जबाबदारी घेत आहे–
पुढचा उमेदवार कोणीही असो निवडणूक एकतर्फी होईल–
पालक मंत्री धनंजय मुंडे
परळी-
बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीत मा. पंकजाताई मुंडे यांचा देशातील लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा विजय असेल त्यांच्या प्रचाराची जबाबदारी मी घेत आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
परळी येथील गोपीनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी पंकजाताई व प्रितमताई गेल्या असता धनंजय मुंडे यांनी तिथे उपस्थित राहून बंधू बहीण यांनी एकत्रित गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी वरील विधान केले. हा क्षण माझ्यासाठी भावनिक असल्याचे म्हटले आहे.
तसेच समोरचा उमेदवार कोणीही असो ही निवडणूक एकतर्फी होईल असे मत व्यक्त केले.
माजी मंत्री, पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बोलताना माजी खासदार व जिल्ह्याचे पालकमंत्री सोबत आहेत. त्यामुळे आपली ताकद मोठी असल्याचे मत व्यक्त केले.
