केज पोलीसांची मोठी कारवाई;
तब्बल १२०० किलो चंदन जप्त
दोन आरोपी ताब्यात
केज-
केज पोलीसांनी धाडसी कारवाई करत तब्बल १२०० शे. किलो चंदन जप्त केले आहे. ज्याची अंदाजे किंमत दोन कोटीच्या घरात आहे.
डिवाएसपी कमलेश मिना, पोलीस निरीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलीसांनी ही धाडसी कारवाई केली आहे. दोन आरोपी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केज पोलीस ठाण्यात भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. मोठे रॅकेट पोलीसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
