केज तहसील कार्यालयाकडून मतदार जनजागृती अंतर्गत सायकल रॅली संपन्न
प्रतिनिधी :
आज दिनांक 28/04/2024 रोजी तहसील कार्यालय केज येथे
केज विधानसभा मतदारसंघ अंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी
मा. जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप प्रोग्राम अंतर्गत सायकल रॅली आयोजीत करण्यांत आलेली होती, सदर रॅली मध्ये सरस्वती कन्या प्रशाला केज, वि.दा. कराड वि. केज, सानेगुरुजी निवासी प्रा.वि. केज, स्वामी विवेकानंद वि. केज, या शाळेतील विद्याथ्यांनी सायकल रॅली मध्ये सहभाग नोंदवला. सदर उपक्रमांस मा. श्री. दिपक वजाळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्वतः सहभाग नोंदवून नागरिकांना प्रोत्साहीत केले. तसेच श्री. अभिजित जगताप तहसीलदार केज, श्री विलास तरंगे तहसीलदार आंबेजोगाई व श्री. लक्ष्मण बेडस्कर गट शिक्षणाधिकारी केज यांनी रॅली मध्ये सहभागी होत मतदान करण्यांविषयी नागरिकांना आवाहन केले. सदर कार्यक्रमांस नागरिक विद्यार्थी कार्यालयीन कर्मचारी व शिक्षक यांचा मोठा सहभाग होता.
