मुख्याध्यापक मदनराव जोगदंड यांचा सेवापूर्ती गौरव संपन्न; केज- तालुक्यातील सादोळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मदन हरिभाऊ जोगदंड हे नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त सेवापूर्ती गौरव सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर प्रमुख पाहुणे ह भ प महादेव आडसूळ महाराज ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल केंद्रे, दत्तात्रय चाटे , सुधाकर ढाकणे, महादेव साबळे ,पुणे येथील उद्योजक सहदेव थोरात, महादेव वैरागे, श्री अंकुशे, केंद्रप्रमुख साळेगाव ,श्री संजय चौरे केंद्रप्रमुख केज, श्री अर्जुन बोराडे केंद्रप्रमुख युसूफ वडगांव, श्री सूर्यकांत काळे केंद्रीय मुख्याध्यापक साळेगाव , प्राचार्य अंकुश भोसले वडगांव, श्री तुकाराम देशमुख…
Author: विजयराज आरकडे
चंदन सावरगाव जवळ दोन कारचा भीषण अपघातात; दोघे जागीच ठार तर एक गंभीर जखमी गौतम बचुटे/केज :- दि. ३१ जानेवारी रोजी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील चंदनसावरगाव जवळ झालेल्या दोन कारच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या बाबतची माहिती अशी की, ३१ मार्च रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास महामार्ग क्र. ५४८-डी केज-अंबेजोगाई रोडवर चंदनसावरगाव जवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन स्विफ्ट कारची समोरा समोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने वस्ती आणि गावातील नागरिक अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात दाखल झाले.…
स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्राथमिक विभाग) केजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थी कलाकार घडतात—डॉ हनुमंत सौदागर केज – केज शहरातील नामांकित शाळा स्वामी विवेकानंद विद्या मंदिर (प्रा) चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात पार पडले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केज गटसधान केंद्राचे जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे, प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे डॉ हनुमंत सौदागर म्हणाले मराठवाडा ही कलाकारांची भूमी आहे स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो यामधून चांगले कलाकार घडतात असे मत व्यक्त केले श्री चाटे म्हणाले बालकलाकारांना पालक चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य करतात असे मत व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती जीवन विकास शिक्षण मंडळ…
*सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.लहाने यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा केजच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा* – प्रा.कलढोणे केज ( प्रतिनिधी ) केजच्या शैक्षणिक वातावरणात गेल्या दहा वर्षांपासून ज्ञानज्योती कोचिंग क्लासेसने आमुलाग्र बदल केले असुन सर्व सामान्य विद्यार्थीही वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात यशस्वी होत आहेत.विद्यार्थांना अभ्यासासाठी प्रेरणा मिळावी म्हणुन लातुर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.विठ्ठल लहाने,प्रा.उदय देशपांडे यांचे प्रेरणादायी व्याख्यान दि.9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता ज्ञानज्योती कोचिंग क्लासेस, डॉ.जाजु काम्पलेक्स , कानडी रोज केज येथे होणार असुन केज तालुक्यातील व शहरातील विद्यार्थी व पालकांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रा.ज्ञानेश कलढोणे यांनी दिली आहे.
केज तालुका सकल मराठा समाजाचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या रास्तारोको केज : मनोज जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची व त्यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र शासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यांचे आंदोलन हे सकळ मराठा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी असल्याने समाजाने त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत त्यांच्या जीवाला कधीही धोका होऊ शकतो. शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ चर्चा करावी यासाठी केज तालुका सकल मराठा-बहुजन समाजाच्या वतीने गुरुवार दि 30 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केज च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाही…
केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश मांजरा नदी पुलाच्या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू: दोन महिन्यात काम पूर्ण होणार केज : गेली पाच वर्षे केज विकास संघर्ष समिती ज्या मांजरा पुलाच्या एक किमी रस्त्याच्या मजबुती व डांबरीकरणासाठी पाठपुरावा करत होती. हे काम आंदोलन करताच युद्धपातळीवर सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलणार खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी मध्यस्थीकडून समितीला सहकार्य केले. खामगांव-पंढरपूर या महामार्गावर मांजरा नदी पूल व पुढे याच रस्त्यावर येरमाळा घाटाखाली असाच खराब रस्त्याचा पॅच मजबुती व डांबरीकरण करावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष…
झोपडपट्टी वासियांच्या हक्कासाठी केज येथे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीची स्थापना केज (प्रतिनिधी) – सरकारी जमिनीवरील घराखालील जागेचे अतिक्रमण कायम करून त्यांना नागरी सुविधा तसेच विविध सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी केज येथे बहुजन चळवळीतील नेते बाबुराव गालफाडे यांच्या निवासस्थानी आज दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी व्यापक बैठक घेण्यात आली. झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष कडूदास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी केज शहरातील बाबुराव गालफाडे, विनायक लोंढे, भिमराव हजारे, महादेव लांडगे, सोमनाथ राऊत, शरद कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते केज नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक झोपडपट्ट्या मधून सरकारी जमिनीवर अनेक गोरगरीब कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत…
सर तुम्ही गुरुजी व्हा” बालनाट्य स्पर्धकांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली बीड:- राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेमध्ये सिंधफना पब्लिक स्कूल माजलगाव या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी “सर तुम्ही गुरुजी व्हा”… ही बालनाटिका यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर बीड या ठिकाणी सादर केली. यामध्ये साने गुरुजीच्या मुख्य भूमिकेत ओजस कुलकर्णी तसेच स्वयंम घायतिडक, अभिनव विटेकर, अभिरा देशमुख, भक्ती गंगणे, वेदिका आगे व इतर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या नाटकासाठी मार्गदर्शन आणि दिग्दर्शन या शाळेतील नाट्यविभागाचे शिक्षक श्री. सखाराम जोशी सर यांनी केले. विद्यार्थी व पालक यांच्या तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारा आणि समाजात आदर्श शिक्षक घडवणारा कळीचा विषय निवडल्यामुळे या नाटकाची सर्वत्र चर्चा होत आहे. या…
मुख्याध्यापक संजय चवरे यांचा मित्रांच्या वतीने सत्कार; गौतम बचुटे (उपसंपादक) – केज : ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सेवा करण्याची संधी मिळालेल्या एका मुख्याध्यापकांचा त्यांच्या सर्व वर्गमित्रांनी सत्कार केला. या बाबतची माहिती अशी की मुख्याध्यापक संजय चवरे हे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे १९८७ च्या बॅचचे विद्यार्थी होते. त्या नंतर ते शिक्षक म्हणून सेवा करीत होते. त्या नंतर सुमारे ३२ वर्षा नंतर संजय चवरे हे त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेचा मुख्याध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्या निमित्त त्यांचे वर्गमित्रांनी एकत्र येवून संजय चवरे यांचा सत्कार केला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे,…
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक होते– – डॉ. हनुमंत सौदागर केज दि २५(प्रतिनिधी) तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जय हिंद..! ही घोषणा देऊन भारतीय तरुणांना एकत्र करून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारत मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणारे सरसेनापती सुभाषचंद्र बोस म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचे महानायक असल्याचे प्रतिपादन डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते महानायक सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य विजयकुमार शिनगारे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महानायक…