केजच्या भवानी चौकात भिषण अपघातात नितीन चाटे वय 35 रा. तांबवा याचा जागीच मृत्यु झाला आहे. एका अवजड वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वर असलेल्या युवक गाडीच्या चाकाखाली आल्यानंतर त्याचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात आज दुपारी 1 च्या सुमारास झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून म्रतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालय केज येथे हलविण्यात आला आहे.
Author: विजयराज आरकडे
अवैध दारू विक्री बंद करा ; महिला आक्रमक; दारू विक्री न होऊ द्यान्यची तरूणाने घेतली शपथ; घोषणाबाजी करत नारीशक्तीचा हल्लाबोल ! केज दि १५प्रतिनिधी- तालुक्यातील जवळबन येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेक जणांचा मृत्यू यापूर्वी झालेला आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले या सततच्या पुरूषांच्या व्यसनाधीनतेला वैतागून गावातील सबंध महिलांनी एकत्र येऊन बुधवार रोजी सकाळी आठ वाजता आक्रोश रॅली गावात काढली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी यामध्ये सहभागी झाले. गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर थेट मोर्चा धडकला. यावेळी महिला आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होत्या पूर्ण गावातून जनजागृती रॅली काढून जिल्हा परिषद शाळेच्या आवारात आक्रोश मोर्चाचा समारोप…
केज उपजिल्हा रुग्णालयातील शौचालयांचे आउटलेट ब्लॉक ; रुग्णांचा संताप शौचालयात घाण साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी केज दि ९(प्रतिनिधी) केज उपजिल्हा रुग्णालयाची प्रशस्त मोठी इमारत बांधण्यात आली. बांधकाम पूर्ण झाल्यापासून काही कालावधीतच शौचालयांचे आउटलेट अर्धवट ब्लॉक झाल्याने रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णालयातील मुख्य इमारतीतील पुरुष आणि महिला शौचालयांमधून सांडपाणी परत येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्गंधीमुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयात ऍडमिट होऊन औषध उपचार घेणाऱ्या रुग्णांना शौचालये वापरण्यास अयोग्य झाल्याने रुग्णांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे. दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे —–चौकट— सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने आउटलेट ब्लॉक…
सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण; वैभव सूर्यवंशीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष; नवी दिल्ली / इंग्लंड प्रतिनिधी : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचत अवघ्या 15 व्या वर्षी भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघात पदार्पण केले आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली असून, सर्वात कमी वयात भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू म्हणून त्याने महान फलंदाज Sachin Tendulkar यांचा 36 वर्षांपूर्वीचा विक्रम मागे टाकला आहे. वैभव सूर्यवंशीने यापूर्वी आयपीएल आणि अंडर-19 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करत क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात निवड झाली असून, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तो कशी छाप पाडतो…
मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी; केज :- केज येथील नगरपंचायतीच्या घरकुल घोटाळ्यात संशयित आरोपी व निलंबित केलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव मस्के यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करावा, या मागण्यासाठी नातेवाईकांनी गुरुवारी रात्री त्यांचा मृतदेह तहसील कार्यालयात आणला. त्यानंतर मध्यरात्री रास्ता रोको आंदोलन ही केले. पहाटे उपविभागीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन ३३ तासाने अंत्यसंस्कार करण्यात आले. केज नगरपंचायतीच्या प्रधानमंत्री घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये संशयित आरोपी असलेले नगरपंचायतीचे वॉलमन भीमराव शामराव मस्के यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर…
मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या; रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प केज, दि. २३ : टाकळी येथील रहिवासी मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी मृतदेहासह दि. २३ रोजी थेट केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. माहितीनुसार, दि. २० जून रोजी रात्री विलास घुले हे गावातील भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. २१ जून रोजी स्व. रा. ती. ग्रामीण रुग्णालय,…
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोसकून खून; केज: येथील कदमवाडी फाट्यावर अनैतिक संबंधाच्या संशयावरून सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या एका हॉटेल चालकाचा चाकू भोकसून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विलास घुले असे मृत हॉटेल चालकाचे नाव असून, गंभीर जखमी झाल्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ जून रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे केज परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कदमवाडी फाट्यावरील…
केजच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कुशल नेतृत्व– अंकुशराव (अण्णा) इंगळे वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव; केज : केजसह संपूर्ण तालुक्यात परिचित असलेले राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व म्हणून अंकुश अण्णा इंगळे यांची ओळख आहे. आडसकर कुटुंबाशी त्यांचे कौटुंबिक संबंध असल्याने स्व. माजी आमदार बाबूरावजी आडसकर साहेब यांच्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास स्व. मेघराज आडसकर आणि सध्या मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजही अविरत सुरू आहे. केज तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक प्रश्नांची सखोल जाण ठेवून ते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिले आहेत. केज ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती केजचे उपसभापती अशी विविध महत्त्वाची…
निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत केज, प्रतिनिधी : शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार श्रीकांत शिंदे हे ‘शिवसंवाद दौऱ्या’निमित्त बीड जिल्ह्यातील केज येथे आले असताना एक दुःखद घटना घडली. केज येथील रसूल गफुर सय्यद उर्फ रसूल बाबा (वय ६५) यांचे बैठकीच्या ठिकाणी अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रसूल बाबा हे व्यवसायाने भाजी विक्रेते होते. मुलाच्या अपघाती निधनानंतर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी, यासाठी ते निवेदन देण्यासाठी कार्यक्रमस्थळी आले होते. याचदरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.…
केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग; केज-(प्रतिनिधी) प्रजावत्सल आणि आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून केज शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून आयोजित केलेल्या या शिबिराला तरुण आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अत्यंत उत्साही वातावरणात हे शिबिर संपन्न झाले. जयंती उत्सवाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी कार्याचे आणि जलव्यवस्थापनातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. केवळ पारंपारिक पद्धतीने जयंती साजरी न करता, समाजातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या विधायक उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल…