Author: विजयराज आरकडे

*पोलीस निरीक्षक पोहोचले पारधी वस्तीच्या शाळेवर* गौतम बचुटे/केज :- कज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील हे प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर एका पारधी वस्तीच्या वस्ती शाळेवर पोहोचले त्यांनीं शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी हितगुज साधत गप्पा मारल्या. दरम्यान दि. २५ जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केज तालुक्यातील कोरेगाव येथील पारधी वस्तीच्या एका वस्ती शाळेला भेट दिली. पारधी वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शाळेतील विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी अनौपचारिक गप्पा मारीत त्यांच्याशी हितगुज साधले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वासार्ह नाते दृढ होण्यास मदत होईल असे बोलले जात आहे.

Read More

*अंबा साखर कारखान्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणासाठी उपस्थित रहा* -रमेशराव आडसकर केज (प्रतिनिधी) केज , अंबाजोगाई,धारूर तालुक्यातील सर्व शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांना प्रजासत्ताक दिना प्रसंगी ध्वज वंदने साठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना अंबाजोगाई येथे दि.26 जानेवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित रहाण्याचे आवाहन चेअरमन रमेशराव आडसकर यांनी केले आहे. या प्रसंगी व्हाईस चेअरमन दत्तात्रय पाटील,कार्यकारी संचालक डी.एन.मरकड , अँड.प्रमोद जाधव, लालासाहेब जगताप,रूषीकेश आडसकर, गोविंदराव देशमुख, राजाभाऊ औताडे, लक्ष्मीकांत लाड, संभाजी इंगळे, डॉ.अनिल किर्दंत व सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत . प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारे ध्वजारोहण चेअरमन रमेशराव आडसकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

Read More

राज्यस्तरीय शालेय किक बोक्सिंग स्पर्धेत गायत्री शिंदे राज्यातून द्वितीय केज – (हनुमंत सौदागर) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्त्रीय शालेय किक बोक्सिंग क्रीडा स्पर्धा झाल्या .यामध्ये कु. गायत्री हनुमंत शिंदे , वजन गट 24 gk मध्ये राज्यातून द्वितीय क्रमांक मिळवला तर कु.गायत्री नेमटे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे प्रशिक्षक राम नेमटे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Read More

आत्तम राठोड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये बीड जिल्ह्यातून प्रथम केज दि.२५(प्रतिनिधी) तालुक्यातील बनेश्वर शिक्षण संस्था संचलित होळ येथील श्री होळेश्वर विद्यालयाचे शिक्षक आत्तम राठोड यांनी ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग ३ वर्ष राष्ट्रीय पातळीवर आणि चौथ्या वेळेस बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे आता ते अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान शिबिरात सहभागी होतील. त्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ.नरेंद्र काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक संजय पालकर, मुख्याध्यापक नंदा गोरे, मुख्याध्यापक देवानंद मुलदोडे, बाळासाहेब खोगरे उपस्थित होते. उत्तम राठोड यांनी टाकाऊ साहित्यापासून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली आहे. त्यांच्या या प्रयोगाला पारितोषिक मिळाले आहे. दरम्यान, आत्तम राठोड हे…

Read More

श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आज स्नेह संमेलनाचे आयोजन; आडस- श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडस येथील शाळेच्या वतीने आज दि. २४ रोजी सायंकाळी ५ वा. स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थी यांच्या कलागुणांना वाव देऊन विविध नृत्य, अभिनय, पारंपरिक कला, भारूड अशा मनोरंजक व प्रबोधन पर व्याख्यान कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. रमेशराव आडसकर, सौ. अर्चनाताई आडसकर, ॠषीभैय्या आडसकर, रंजितदादा आडसकर, व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाची जय्यत तयारी शाळेच्या वतीने करण्यात आली असून आडस व परिसरातील सर्व पालक, विद्यार्थी,…

Read More

वसंत फार्मसी काॅलेज मध्ये सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केज- दि.23 जानेवारी रोजी वसंत डि.व बी. फार्मसी काॅलेज मध्ये सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी काॅलेज चे प्राचार्य डॉ. विशाल नालमवार यांनी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .या वेळी काॅलेज मधील सर्व स्टाफ व विध्यार्थी यांनी पुष्प वाहुन अभिवादन केले .या वेळी प्रा.अविनाश थळकरी,प्रा.महादेव लांडगे ,प्रा.राम चौरे प्रा. अभीजीत राउत प्रा. गोपालघरे मॅडम, प्रा. तलेकर मॅडम,शेख मॅडम प्रा.सावरे धनराज प्रा. नवघरे मॅडम,सद्दाम शेख,मोहसिन शेख,यमोदीन इनामदार आदी उपस्थित होते..

Read More

*वाल्मीक कराड यांच्या जामीन प्रकरणाला नाट्यमय वळण !* *वाल्मीक कराड यांचा जामीन अर्ज माघारी !* गौतम बचुटे/केज :- वाल्मीक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामीन प्रकरणाला आज नाट्यमय वळण मिळाले असून आरोपीच्या वकिलाने सादर केलेला जामीन अर्ज माघारी घेतला. या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट आणि मकोका अंतर्गत न्यायालयीन कोठडीतील आरोपी वाल्मीक कराड यांच्यावरील आवादा एनर्जी या पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा आरोप असून खंडणी प्रकरणी देखील त्यांना न्यायालयीन कोठडीत मिळालेली आहे. खंडणी प्रकरणी आज दि. २३ जानेवारी त्याच्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी होणार होती. दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सरकारी वकील…

Read More

आणखी एका बीडकर सुकन्येची अभिमानास्पद कामगिरी; दिल्लीतील राजपथावर “परेड कमांण्डर” म्हणून निवड. – कु.दामिनी ची एअरफोर्समध्ये पायलट म्हणून देशसेवा – कु.दामीनीनं बीडचं नाव देशभर रोशन केलं – तत्कालीन चँरिटी कमिशनर न्या.दिलीप देशमुख यांच्या कन्येची देशभर किर्ती – ऊस तोडणी कामगारांचा नाही तर कर्तृत्ववान युवकांचाही बीड जिल्हा.. बीड/प्रतिनिधी खो-खो वर्ल्डकपवर कु.प्रियंका इंगळे या बीडकर कन्येनं आपला ठसा उमटविला आहे.आता आणखी एका बीडकर सुकन्येनं सर्वांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करून बीडचे नाव देशभर रोशन केले आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील देवडी गावची मुळ रहिवासी असलेली कु.दामिनी दिलीप देशमुख हीची 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या परेडसाठी “परेड कमांण्डर”…

Read More

*पोलीस असल्याचे सांगून १ लाख २० हजार रु. किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले* गौतम बचुटे/केज :- आम्ही पोलीस असून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून ठेवा असे म्हणून महिलेला दागिने काढण्यास सांगून हातचलाखी करून खरे १ लाख २० हजार रु. किमतीचे मिनी गंठण व कानातील झुंबर हे दागिने घेवून पोबारा केला आहे. या बाबतची माहिती अशी की, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास रामकंवर उर्फ अनिता शंकर राऊत वय ५० वर्ष ही महीला केज-कळंब रोड लगत असलेल्या साई नगर येथील धुणी-भांड्याचे काम आटोपून विठाई पुरमकडे जात असताना लोहीया यांचे हार्डवेअरच्या दुकानाच्या बाजुने जात असताना समोर एक व्यक्ती ऊभा होता.…

Read More

*बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाच्या वतीने “स्कुल कनेक्ट भाग 2.0″अंतर्गत केज तालुक्यातील शाळांमध्ये जनजागृती* केज (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्या वतीने 1 ते 15 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,-2020अंतर्गत स्कुल कनेक्ट 2.0 संपर्क अभियानांतर्गत केज तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयात जन जागृती कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यार्थी, शिक्षक,पालक या मध्ये जागृती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने “स्कूल कनेक्ट भाग 0.2” संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज च्या वतीने वसंत विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला केज ,शंकर विद्यालय साळेगाव ,लाल बहादूर शास्त्री विद्यालय चंदन सावरगाव,शंकर विद्यालय साळेगाव,माऊली विद्यालय जवळबन या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात…

Read More