Author: विजयराज आरकडे

रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय साहित्य व खाऊचे वाटप केज – स्व. रेखाताई गोदाम (आरकडे) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व पत्नी सोनल यांनी आईने शिक्षण घेतलेल्या बोरगाव (बु) येथील जि. प. शाळेत दि. ६ रोजी विद्यार्थ्यांना तिन डझन लेझीम व सर्व विद्यार्थी यांना खाऊचे वाटप करून स्मृतीशेष आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन केले. या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक देशमुख एस. बी. प्रमुख पाहुणे म्हणून मेजर संग्राम आरकडे , पत्रकार विजय आरकडे तसेच साकरबाई आरकडे, प्रभावती आरकडे,    स्मिता आरकडे,   कविता गायकवाड, मनिषा आरकडे, भैय्यासाहेब आरकडे, रोहीत गायकवाड, जयश्री गायकवाड, योगेश आरकडे, बोरगाव (बु ) शाळेचे शिक्षक…

Read More

विष्णू चाटे आणि जयराम चाटे यांची केज पोलीस ठाण्यात चौकशी गौतम बचुटे/केज :- केज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी ज्या खंडणी प्रकरणाचा सबंध जोडला जात आहे; त्या खंडणी आणि हत्या या दोन्ही प्रकरणातील सीआयडीच्या ताब्यात असलेला आरोपी अनुक्रमे विष्णू चाटे आणि जयराम चाटे याला तपासासाठी केज पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग ता केज येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या दि. ९ डिसेंबर रोजी अपहरण करून झालेल्या हत्या करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्ये नंतर विष्णू चाटे हा देखील फरार झाला होता. त्या नंतर तब्बल दहा दिवसांनी म्हणजे १९ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला पोलिसांनी…

Read More

हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या केज तालुका अध्यक्षपदी शेख सनी यांची निवड ! बीड : प्रतिनिधी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या पदाधिऱ्यांची ऑनलाईन बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी यांच्या अक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.संजय तुपे यांनी प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी,बीड जिल्हाध्यक्ष अजय भांगे यांच्या सहमतीने व प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी यांच्या निर्देशाने हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या केज तालुका अध्यक्षपदी शेख महेबूब (सनी) यांची नियुक्ती केली. हिंदुस्तान जर्नलिस्ट असोसिएशनच्या केज तालुका अध्यक्षपदी शेख महेबूब (सनी) यांची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असलम कुरेशी,प्रदेश कार्याध्यक्षा आयेशा खान मुलानी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बालाजी अडियाल,…

Read More

संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपीसह दोघांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी; सरपंच संतोष देशमुख यांची माहिती देणाराही ताब्यात; फरार आरोपींना मदत करणाराही जेरबंद; कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार; गौतम बचुटे/केज ,:- संतोष देशमुख हत्याकांडातील पुणे येथून दोन आणि कल्याण येथून एक असे तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. या बाबत ची माहिती अशी की, मागील २५ दिवसा पासून संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे पोलिसांना जंग जंग पछाडून सापडत नव्हते. यासाठी विविध ठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आलेली होती. तरीही आरोपी पकरण्यात तपास…

Read More

सरपंच संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपीसह एक जण पोलीसांच्या ताब्यात बीड- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले सह सुधीर सांगळे यांना पुण्यातून ताब्यात घेतले असल्याचे बीड पोलीस यांनी माहिती दिली आहे. अद्याप एक आरोपी फरार आहे. बीड, केज, पोलीस दल, सीआयडी व एस आय टी पथकाकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. हे मोठे यश मिळाले असून यामुळे संतोष देशमुख हत्येचा उलगडा होणार आहे.

Read More

डॉ हनुमंत सौदागर मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केज दि १(प्रतिनिधी) तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र डॉ हनुमंत सौदागर यांना मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने तुळजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महाविद्यालयत्तर उपक्रम पर्यावरण संवर्धन, जल साक्षरता, स्वच्छता अभियान, उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण कृतिशील उपक्रम अशा विविध कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यास जि प धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गायकवाड,इतिहास अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे, तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,संयोजन समितीचे राजकुमार धुरगुडे,महेंद्र धुरगुडे, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव…

Read More

संतोष देशमुख हत्या ही राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना — ना. रामदास आठवले सर्व आरोपी व मुख्य सुत्रधाराला तात्काळ अटक करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार – ना. रामदास आठवले गौतम बचुटे/केज :- संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी समाजाला राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना असून या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात यावा. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र्याची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन प्रसार माध्यमाशी बोलताना…

Read More

प्रा.डॉ.शंकर वाघमारे यांना फुले शाहू आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर नेकनूर- प्रमिलादेवी पाटील महाविद्यालय नेकनूर येथील मराठी विभाग प्रमुख तथा संशोधन मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. शंकर वाघमारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व पटाया इंडियन असोशियन बँकॉक यांच्या वतीने देण्यात येणारा 2024 चा फुले, शाहू,आंबेडकर अंतरराष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. डॉ शंकर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 विद्यार्थयांनी पीएच.डी पूर्ण केली आसून,4 विद्यार्थीयांना ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे 4 पुस्तके व 48 राष्टीय अंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.त्यांनी बौद्ध साहित्य परिषदच्या माध्यमातून 6 अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलन महाराष्ट्रत वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली होती. तसेच त्यांनी 3 अखिल भारतीय…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय हवा या मागणीसाठी जनसागर एकवटला छत्रपती संभाजी राजे, जरांगे पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना अटक करून फासावर चढवा व या हत्येमागील सुत्रधार शोधून संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी आज दि. २८ रोजी बीड येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील जनसागर या मोर्चाला उपस्थित राहीला असल्याचे दिसून आले. छत्रपती संभाजी राजे, मनोज जरांगे पाटील, खा. बजरंग सोनवणे, मविआ चे आ. जितेंद्र आव्हाड, आ.सुरेश धस, आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षिरसागर, आ. विजयसिंह पंडित, तसेच जिल्ह्यातील सर्व…

Read More

गोविंदेश्वर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहलीत घेतला सरदेशपांडे हुर्डा पार्टीचा आनंद नांदेड – गोविंदेश्वर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल सरदेशपांडे हुरडा पार्टी परभणी येथे गेली असता इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सरदेशपांडे हुरडा पार्टी येथे शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. या सहलीत विद्यार्थ्यांनी रेन डान्स हॉर्स रायडिंग झोके बैलगाडी ट्री हाऊस घसरगुंडी शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम युक्त खेळ अशा विविध खेळांचा आनंद घेतला. तसेच मुलांना जादूगर यांचा शो दाखवण्यात आला यानंतर मुलांना खाण्यासाठी पिझ्झा न्यूडल्स पोहे अशा वेगवेगळ्या आवडीनुसार विशिष्ठ प्रकारच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी जेवणाची देखील खाण्याचे विविध प्रकार व उत्तम सोय करण्यात आली.शाळेच्या चार भिंतीशिवाय मुलांना निसर्गात फिरायला आवडते सहलीतून…

Read More