Author: विजयराज आरकडे

शारदा इंग्लिश स्कूल केज येथे NEET ची परीक्षा सुरळीतपणे पडली पार; केज येथे परिक्षा केंद्र मिळाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त केज – केज शहरातील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारदा ईंग्लिश स्कूल या नामांकित शाळेमध्ये यावर्षी पहील्यांदाच NEET 2025 परिक्षा झाली. अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली. मेडिकल क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणून Neet परीक्षेकडे सध्या अनेक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर ओढा आहे. यामुळे या परीक्षेला प्रत्येक केंद्रावर तोबा गर्दी होत असते. यावर्षी पहिल्यांदाच केज शहरामध्ये देखील ही परीक्षा झाली. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या शारदा ईंग्लिश स्कूल या नामांकित शाळेमध्ये चोख पोलीस बंदोबस्तात ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली आहे.…

Read More

स्व. संतोष देशमुख यांची लेक वैभवीने बारावीच्या परिक्षेत मिळवले घवघवीत यश ! गौतम बचुटे/केज – मस्साजोगमध्ये वडिलांची दिवसा ढवळ्या झालेली हत्या. संतोष देशमुख यांच्या न्यायासाठीचा लढा आणि वडिलांच्या हत्ये नंतर घरातील प्रचंड तणावाच्या वातावरणात डोळ्यात पाणी, ह्रदयात आभाळा एवढे दुःख अशा मानसिकतेतून जात वैभवी देशमुख हिने १२ वी. ची परीक्षा दिली होती. परीक्षा देण्याची मानसिकता नसली तरी कुठेतरी मन एका जागेवर आणून वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन अगदी घट्ट करून वैभवी देशमुख हिने बारावी बोर्डाची परीक्षा दिली. आणि आज त्या परीक्षेचा निकाल लागला. वैभवी देशमुख हिने विशेष प्राविण्यासह ८५.३३% गुण प्राप्त केले आहेत. दिवंगत संतोष देशमुख यांना दोन मुले…

Read More

आनंदवनात ग्रीष्मकालीन उन्हाळी योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिर केज – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आनंदवनात २५ एप्रिल रोजी सहावे ग्रीष्मकालीन योग व क्रीडा प्रशिक्षण शिबिर प्रारंभ झाला. शिबिराचा तिसरा दिवस रविवार रोजी सकाळी ध्वजारोहण व प्रार्थना घेऊन करण्यात आली. वरोरा पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख उपस्थिती पत्रकार डॉ.हनुमंत सौदागर,क्रिडा प्रशिक्षक तानाजी बायस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. उन्हाळी शिबिरामध्ये विविध क्रिडा प्रशिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. प्रतिवर्षी होणाऱ्या या शिबिरातून शेकडो विद्यार्थ्यांनी पुरस्कार मिळवलेले आहेत. यावेळी बोलतांना गटविकास अधिकारी गजानन मुंडकर म्हणाले अभ्यासबरोबर मैदानी खेळ आवश्यक आहेत.खेळामुळे शरीर निरोगी अन मन प्रसन्न राहते.…

Read More

विकसित भारत घडवायचा असेल तर सांस्कृतिक मूल्ये जपण्यावर भर दिला पाहिजे- डॉ. उदय निरगुडकर केज – आपल्या मुलांचे चांगले भविष्य घडवायचे असेल तर आपण त्यांना शाळेमध्ये पाठवतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेतो तसेच आपली तब्येत चांगली हवी असेल तर आपण जिम लावतो. या प्रक्रियेमध्ये आपल्याला काहीही करावे लागत नाही. कारण बदल घडवून आणण्याची जबाबदारी ही डॉक्टर, शाळा तसेच जिम मालकांची असते. तसेच राज्य चालवण्याची जबाबदारी ही आपण निवडून दिलेल्या सरकारची असते. जर त्यांनी योग्य पद्धतीने समाजाचे प्रश्न सोडवले नाही तर आपण दुसरे सरकार निवडून आणतो. ही एक प्रक्रिया आहे. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक १९५२ मध्ये झाली. पुढील काळात १९६२ मध्ये…

Read More

केज येथील टोलनाक्या जवळ पीक-अप आणि स्विफ्टचा अपघात : अपघात आठ जखमी गौतम बचुटे/केज : केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखाना असलेल्या टोल नाक्यावर पासून काही अंतरावर स्विफ्ट आणि पीक-अपच्या अपघातात आठ जण जखमी असून त्यात दोन महिला मुलगा व चार पूरूष यांचा समावेश आहे. या बाबतची माहिती अशी की, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता केज मांजरसुंबा रोडवर गंगा माऊली साखर कारखान्यास जवळ असलेल्या टोल नाक्यावर पासून सुमारे २०० मिटर अंतरावर एक भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार क्र. (एम एच-१४/एफ सी-२०३८) ही अंबाजोगाईत बीडच्या दिशेने जात होती ती कार आणि पुण्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील त्यांच्या गावाकडे जात असलेल्या…

Read More

आयुष्य खुप सूंदर आहे ते जगता आले पाहिजे- उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर केज प्रतिनिधी: जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीत नाही तर आपल्या मनात रुजवले पाहिजे. आरश्यात दिसणाऱ्या स्वतःला आहे तसं स्वीकारायला शिका खरंच आयुष्य खुप सूंदर आहे, फक्त ते जगता आले पाहिजे. आयुष्यामध्ये चढ-उतार हास्य-अश्रू यश-अपयश येतच असतात. हे सर्व माणसाच्या जीवनाचा भाग आहे. आणि हेच जीवनाला सुंदर आणि खरोखर जगण्यासारखे बनवतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी, संवाद, आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा अत्यंत आवश्यक आहे. तसेच या धकाधकीच्या जीवनामध्ये माणसा-माणसांमधील संवाद हरवत चाललाय. तेंव्हा एकमेकांशी संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे. आपले विचार, भावना आणि अपेक्षा स्पष्टपणे व्यक्त करणे, एकमेकांच्या…

Read More

प्रत्येक व्यक्तीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे- पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने केज प्रतिनिधी या स्पर्धेच्या युगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने ध्येयवादी बनले पाहिजे, तरच आपल्या संकल्पांची सहज प्राप्ती होईल. ज्यांनी आपल्या मनात आशा, विश्वास, प्रयत्न आणि डोळस श्रद्धा बाळगली असेल, अशी माणसंच आपल्या जीवनध्येयाची उंच शिखरं सहज गाठू शकतात. जीवनामध्ये अनेक स्वप्न बघा पण वाटचाल करत असताना टप्प्याटप्प्याने त्याची पूर्तता करा. यासाठी आपण कठोर परिश्रम, दृढ विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती मनात बाळगली पाहिजे. संकल्पाला आत्मविश्वासाचा आणि समर्पण वृत्तीचा सहवास लाभला तर तो सिद्धीस जातो. आपल्या जीवनाची खरी सार्थकता आशावादी दृष्टिकोन बाळगून जगण्यात आहे. खरं तर आशावादी माणसं प्रयत्नवादी असतात.…

Read More

केज येथे विजय स्पोर्ट्स क्रीडा अकॅडमीचे वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केज- केज शहर व तालुक्यातील खेळाडूंसाठी विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने विविध खेळांच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकॅडमीचे संचालक विनोद गुंड यांनी दिली आहे.         विजय स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने १ मे ते १ जून दरम्यान एक महिन्याचे फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, योगा, बुद्धीबळ, तायक्वांदो खेळाचे  उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आयोजन केले आहे. या शिबिरामध्ये शास्त्रशुध्द पध्दतीने क्रीडा प्रशिक्षण दिले जाणार असून या शिबिरात १४ वर्षाखालील मुला – मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. हे शिबिर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या स्कूलच्या मैदानावर सकाळी ६ ते ८ या वेळेत…

Read More

लॉंड्री चालक शंकर राऊत यांचा प्रमाणिकपणा केज – केज शहरात बस स्थानकालगत छोटीशी लॉन्ड्री चालवणारे शंकर राऊत यांनी एका ग्राहकाचे विसरून राहिलेले पॉकेट त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. ग्राहक महेंद्र साटे यांचे पॉकेट होते. पॉकेट मध्ये असलेली पंधरा हजार रुपये रक्कमेसह पॉकेट परत केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये काम करणारे राऊत यांनी प्रामाणिकपणा दिसून आला. आजही प्रामाणिकपणा आहे त्याची पावती मिळाली. फोन करून त्यांना बोलावून घेऊन पॉकेट परत केले. एकीकडे सर्वत्र खोटारडेपणा सुरू असतानाही अशी प्रमाणिक माणसे आहेत याचा प्रत्यय आला. माझे कष्टाचेच मला पुरे तुमचा एकही रुपया मला नको असं काम करणारी माणसं ही समाजात आहेत. राऊत मामा यांचे सर्वत्र कौतुक…

Read More