Author: विजयराज आरकडे

जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश; एमपीएससीत उत्तीर्ण होऊन सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती; तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास बातमी : केज : जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केज येथील उमरी रोड परिसरात राहणाऱ्या प्रविण भारत शिंपले या युवकाने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमपीएससी ग्रुप क्र. २०२४ अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्याची नवी मुंबई येथील सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती झाली आहे. प्रविणचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होते. आई-वडील शेतमजुरी करून त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते.  वेळोवेळी प्रविण ला जवळच्या मित्रांनाही शिक्षणासाठी लागेल ती मदत केली आहे. या कष्टाचे चीज करत प्रविणने आपल्या मेहनतीच्या…

Read More

केकतसारणी येथे ७ मे रोजी राष्ट्रचिंतन अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन, कृषी,आरोग्य आणि शिक्षण विषयावर रंगणार चर्चा ; महर्षी गज अरविंदजींची प्रमुख उपस्थिती बहुसंख्येने उपस्थित रहावे- राधाताई सपकाळ केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील केकतसारणी येथे हिंदराष्ट्र ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने ‘राष्ट्र चिंतन अभियान’अंतर्गत येत्या गुरुवारी,७ मे २०२६रोजी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात कृषी,आरोग्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. हे चर्चासत्र केकतसारणी येथील मारुती मंदिर सभागृहात सकाळी ९ ते ११ या वेळेत संपन्न होईल.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महर्षी गज अरविंदजी उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येणार आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रश्नोत्तर…

Read More

माध्यमे ही केवळ माहितीचे साधन न राहता, ती लोकशाही मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि सत्यतेच्या आधारावर चालणारी असावीत – सुहास सरदेशमुख केज- युद्धाचे सर्वसामान्य परिणाम अत्यंत विनाशकारी आणि दीर्घकालीन असतात, जे केवळ लढणाऱ्या देशांवरच नाही, तर संपूर्ण जगाला विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. युद्धामुळे मानवी संस्कृती आणि प्रगती कित्येक वर्षे मागे जाते. दुसऱ्या महायुद्धासाठी जबाबदार असलेला ॲडॉल्फ हिटलर तसेच विन्स्टन चर्चिल हे युद्धाचे वार्ताहर व नंतर सूत्रधार झाले. बदलत्या काळात युद्धासाठी घातक शस्त्र तयार करण्याचे तंत्र विकसित झाले. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वात होरपळणारी व्यक्ती म्हणजे महिला. या परिस्थितीत माध्यमांची भूमिका फार महत्त्वाची ठरते. परंतु सध्याचे चित्र पाहता सध्याचे जर्नालिझम हे हेल्थ नसून ते…

Read More

स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दिर्घ आजाराने निधन; केज (प्रतिनिधी) – केज शहरातील फुले नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या स्व. मंडुबाई दत्तू लोंढे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या आकाश लोंढे सर व विलास लोंढे सर यांच्या मातोश्री होत्या. दि. २५ एप्रिल रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने लोंढे परिवारासह परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी क्रांती नगर, केज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. मंडुबाई लोंढे यांच्या पश्चात मुले, सुना, मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थ्यांनी कु.गार्गी गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड केज/प्रतिनिधी केज येथील माऊली विद्यापीठ अंतर्गत सरस्वती कन्या प्रशालीची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी हिची एन.एम.एम.एस. परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल कु.गार्गी गवळी सह सरस्वती कन्या प्रशालेच्या सर्व मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. २०२५-२६ ची एन.एम.एम.एस. परीक्षा ही दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल हा दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी लागला असून दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. या निवड यादीमध्ये सरस्वती कन्या प्रशालेची विद्यार्थिनी कु. गार्गी तात्या गवळी या विद्यार्थिनीची निवड…

Read More

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात; केज- केज शहरातील कानडी रोडचे काम नगरोथ्थान योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले असले तरी या कामात अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. विशेषतः प्रशांत नगर परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या नाल्यावर कोणताही संरक्षणात्मक कठडा बांधण्यात आलेला नाही. यामुळे नागरिक, पादचारी तसेच वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जवळच मोठी शाळा असून सतत रहदारी असते. पुढे अनेक गावांकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने येथे दिवसभर वर्दळ असते. मात्र नाल्यावर कठडा नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी…

Read More

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न; केज (प्रतिनिधी) : भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संविधान एकता युवा मंच, केज यांच्या वतीने निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये डॉ. आंबेडकर यांचे कार्य, विचार व देशासाठीचे योगदान याबद्दल जागृती व्हावी, या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावीपणे उभे केले, तर चित्रकला स्पर्धेतून त्यांच्या जीवनकार्याचे सुंदर चित्रण साकारण्यात आले. या स्पर्धांमध्ये केज शहरातील वसंत माध्यमिक विद्यालय, जय भवानी कन्या प्रशाला तसेच वसंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.…

Read More

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन* केज: केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि…

Read More

संविधान एकता युवा मंच तर्फे केजमध्ये भव्य भिम जन्मोत्सव कार्यक्रमांचे आयोजन; ________________________________________ पहाट परिवर्तनाची भिमगितांचा बहारदार कार्यक्रम; आवाज आपल्या कलाकारांचा सुरेल संगीत गीतांचा नजराणा, निबंध स्पर्धा, चित्रकला, वकृत्व स्पर्धां, सांस्कृतिक कार्यक्रम, वस्तीगृह निवासी विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप, व्याख्यान व स्नेेह भोजन; ________________________________________ बातमी : केज : संविधान एकता युवा मंच, कानडी रोड केज यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शालेय प्राथमिक व माध्यमिक गटासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, तसेच गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच…

Read More