Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

नियोजित कालावधीत स्व गणना करावी– तहसीलदार अशोक भंडारे

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 10, 2026No Comments2 Mins Read

नियोजित कालावधीत स्व गणना करावी–
तहसीलदार अशोक भंडारे

केज-(प्रतिनिधी)

देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना (Self Enumeration) करण्यासाठी केज तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांनी योग्य ती कार्यवाही करुन नियोजित कालावधीत स्वगणना करावी, असे निर्देश तहसीलदार अशोक भंडारे यांनी दिले .

देशातील १६ वी राष्ट्रीय जनगणना अंतर्गत घर यादी व घरगणना हा पहिला टप्पा १ मे पासून सुरू झालेला आहे. सदर जनगणनेत नागरिकांसाठी स्वगणना (Self Enumeration) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असून १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वतः ही माहिती ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. ही प्रक्रिया सुलभ, वेगवान व वेळेची बचत करणारी असल्याने याबाबत व्यापक जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. स्वगणना प्रक्रियेसाठी नागरिकांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मोबाईल क्रमांक व OTP द्वारे लॉगिन करावे, आपल्या घराचे अचूक जिओ-लोकेशन नोंदवावे, कुटुंबाशी संबंधित सुमारे ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरावी,

प्रभावी जनजागृती करण्याचे आवाहन

स्वगणना बाबत नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती करावी, कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वगणना पूर्ण करण्यास प्रोत्साहित करावे, सूचना फलक, सामाजिक माध्यमे व स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे माहिती प्रसारित करावी, आवश्यकतेनुसार नागरिकांना मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी केले आहे.

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारा ११ अंकी Self Census (SC) क्रमांक सुरक्षित ठेवावा, १५ मेनंतर प्रगणक संबंधित घरांना भेट देतील. त्या वेळी नागरिकांनी केवळ ११ अंकी SC क्रमांक उपलब्ध करून दिल्यास माहितीची पडताळणी त्वरित होऊन वेळेची बचत होईल. अशी माहिती तहसीलदार यांनी दिली.

विजयराज आरकडे

Post Views: 40
विजयराज आरकडे

Related Posts

शिवकालीन युद्धकला व शिवसंस्कार उन्हाळी शिबीर सांगता समारंभ उत्साहात संपन्न;

May 14, 2026

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, आडसचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.६२ टक्के! ​ गुणवत्तेची परंपरा कायम;

May 8, 2026

केज उपजिल्हा रुग्णालय शस्त्रक्रियात जिल्ह्यात अव्वल; रुग्णसेवेचा उच्चांक

May 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 7 6 3
Total Users : 146763
Views Today : 13

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.