Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केकतसारणी येथे ७ मे रोजी राष्ट्रचिंतन अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन, कृषी,आरोग्य आणि शिक्षण विषयावर रंगणार चर्चा ; महर्षी गज अरविंदजींची प्रमुख उपस्थिती बहुसंख्येने उपस्थित रहावे- राधाताई सपकाळ

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेMay 3, 2026No Comments1 Min Read

केकतसारणी येथे ७ मे रोजी राष्ट्रचिंतन अभियान अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन, कृषी,आरोग्य आणि शिक्षण विषयावर रंगणार चर्चा ;

महर्षी गज अरविंदजींची प्रमुख उपस्थिती

बहुसंख्येने उपस्थित रहावे-
राधाताई सपकाळ

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील केकतसारणी येथे हिंदराष्ट्र ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने ‘राष्ट्र चिंतन अभियान’अंतर्गत येत्या गुरुवारी,७ मे २०२६रोजी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात कृषी,आरोग्य आणि शिक्षण या तीन महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे.

हे चर्चासत्र केकतसारणी येथील मारुती मंदिर सभागृहात सकाळी ९ ते ११ या वेळेत संपन्न होईल.या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महर्षी गज अरविंदजी उपस्थित राहणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येणार आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रश्नोत्तर सत्र

या चर्चासत्रात कृषी, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातील विविध मान्यवर आपली मते मांडणार आहेत.केवळ मार्गदर्शनच नव्हे,तर नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी विशेष प्रश्नोत्तर सत्राचे आयोजनही करण्यात आले आहे.यामध्ये उपस्थित नागरिक आपले प्रश्न मांडू शकतील आणि मान्यवर त्यांचे निरसन करतील.राष्ट्र उभारणीत कृषी,आरोग्य आणि शिक्षण हे तीन आधारस्तंभ आहेत.या विषयांवर जनजागृती व्हावी आणि नागरिकांच्या समस्यांना व्यासपीठ मिळावे,या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन केले आहे, अशी माहिती हिंदराष्ट्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ.राधाताई सपकाळ यांनी दिली.या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला केकतसारणी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 83
विजयराज आरकडे

Related Posts

सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण; वैभव सूर्यवंशीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष;

July 4, 2026

मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी;

June 27, 2026

मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 6 7 4
Total Users : 147674
Views Today : 21

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.