Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJune 23, 2026No Comments2 Mins Read

मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यात म्रतदेह घेऊन आंदोलकाचा ठिय्या;

रस्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

केज, दि. २३ : टाकळी येथील रहिवासी मृत विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी मृतदेहासह दि. २३ रोजी थेट केज पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
माहितीनुसार, दि. २० जून रोजी रात्री विलास घुले हे गावातील भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. २१ जून रोजी स्व. रा. ती. ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, हल्ल्यातील फरार आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. दरम्यान, दि. २३ जून रोजी आंदोलकांनी मृतदेहासह थेट केज पोलीस ठाण्यात धडक देत आंदोलन अधिक तीव्र केले.
सकाळपासूनच आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, केज येथे मुख्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून महामार्ग काही काळ ठप्प झाला. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासन आणि आंदोलक यांच्यात वारंवार चर्चा व बैठका सुरू असून, आरोपींच्या अटकेबाबत ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. या प्रकरणात पुढे कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 128
विजयराज आरकडे

Related Posts

मयत न.प.कर्मचारी भिमराव मस्के यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची सर्व स्तरातून होत आहे मागणी;

June 27, 2026

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालकाचा चाकू भोसकून खून;

June 22, 2026

केजच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कुशल नेतृत्व– अंकुशराव (अण्णा) इंगळे वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव;

June 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 5 9 2
Total Users : 147592
Views Today : 18

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.