सतत विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण ; दहा एमव्हीए चा ट्रान्सफॉर्मर बसवला तरीही परिस्थिती जैसे थे केज- केज शहरात मागील काही दिवसांत तासनतास सतत विजेचा लपंडाव चालू असल्याने नागरीक हैराण झाले आहेत. कोणतीही पुर्वसुचना न देता दिवसा व रात्री विज पुरवठा खंडित होत आहे. विज वितरण कार्यालयात संपर्क केला असता फोन लागत नाही त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा यक्षप्रश्न निर्माण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी दहा एमव्हीए क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवला असून आतातरी विज पुरवठा अखंडीतपणे चालू राहील अशी अपेक्षा होती, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थेच असल्याने सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक…
Author: विजयराज आरकडे
रामनवमी निमित्ताने सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धा संपन्न केज- रामनवमी निमित्ताने कानडी रोड येथील हनुमान मंदीर (वकीलवाडी) येथे सामान्यज्ञान व चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आला होते. या स्पर्धेत लहान मुला मुलींना मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. स्पर्धा संपल्यानंतर रामनवमी निमित्ताने महाप्रसादाचा लाभही परिसरातील भाविकांनी घेतला. लहान विद्यार्थी यांनी एकत्रित येऊन हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवाशिष रमेशराव आडसकर, गायकवाड, राऊत,कदम व सर्व मित्र परिवारने परिश्रम घेतले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर घटनेतील आरोपींना फाशी व्हायला हवी — गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम या पुढे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही गौतम बचुटे/केज संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्दतीने हत्या करण्यात आली. त्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला हवी असे माझे वैक्तीक मत असून जर या हत्या प्रकरणातील कोणत्याही कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर ते गैर असून त्याची सुद्धा चौकशी केली जाईल तसेच या सर्व प्रकरणाकडे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे या सर्व प्रकरणात कडे लक्ष ठेवून आहेत आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे त्यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी असताना त्यांची पोलीस…
विज कोसळून केज तालुक्यात शेतकरी अन् गायीचा बळी केज – दुपारी केज तालुक्यातील आडस,केकानवाडी या भागात अवकाळी पाऊस झाला. यावेळी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा अन् गायीचा मृत्यू झाल्याची घटना आज दि. ३ रोजी घडली आहे. देवीदास शहाजी केकाण (वय ६५ वर्ष) रा. केकाणवाडी असे वीज कोसळून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते दुपारी आसरडोह रस्त्याकडील नवरुका शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे होते. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर एक गाय ही दगावली आहे. वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजा प्रमाणे आज दुपारी…
नवरंग आर्टस समोर पिण्याच्या पाण्याची सोय ;पाणपोईमुळे नागरिकांना मिळणार दिलासा केज – उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, वृध्द नागरिक, पादचारी यांना याचा लाभ मिळावा यासाठी शहरातील राज्य महामार्गावर नवरंग आर्टस समोर पाणपोई उभारली आहे. यासाठी पठाण गफफार ,खाजाभाई शेख , प्रा बाबासाहेब काळे यांनी पाणपोई उभारली आहे. या पाणपोईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने, केजमधील या नागरिकांनी पुढाकार घेतला आणि शहरातील एका प्रमुख चौकात पाणपोई उभारली. नागरिकांची प्रतिक्रिया: या पाणपोईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने नागरिक खूप आनंदी आहेत. या पाणपोईच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा…
रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ! केज- केज तालुका रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने मुस्लिमधर्मीय बांधव यांच्या पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी मुस्लिम धर्मीय बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजाच्या उपवासा निमित्त दि. २९ मार्च रोजी लव्हुरी येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्याच सोबत लव्हुरी येथे उभारलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन…
अपहरण करून २५ लाख रु. खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या केज पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! खंडणीखोर गुन्हेगार केज येथे एका तृतीयपंथी सोबत राहात होता ! गौतम बचुटे/केज :- जालना जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाचे २५ लाख रु. च्या खंडणीसाठी अपहरण करून खंडणी न दिल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या अपहरणकर्त्या पैकी एका गुन्हेगाराला केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मार्च रोजी केज येथील फुले नगर येथून ताब्यात घेतलेला आरोपी आकाश घुगे आणि त्याचे साथीदार यांनी दिनांक २२ मार्च रोजी रात्री ३:३० वा. च्या सुमारास जालना जिल्ह्यातील धानोरा येथील वीटभट्टी मालक निवृत्ती रामभाऊ तांगडे…
शाहीर तुकाराम सुवर्णकार यांना युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार केज – तालुक्यातील बनसारोळा येथील भूमिपुत्र शाहीर तुकाराम सूर्यकांत सुवर्णकार यांना अखिल भारतीय सोनार समाज प्रतिष्ठान ,अंबाजोगाई यांच्या कडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार २०२५ चा युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तुकाराम सुवर्णकार महाराज हे परिसरात अनेक वर्षापासून शाहीर म्हणून परिचित आहेत गायन ,जनजागृती कलाक्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना युवा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित, निवड समितीचे राजेंद्र पारखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वसंत प्रा. शाळेचा विद्यार्थी अवधूत राऊत याचे एम.टी.एस.परिक्षेत घवघवीत यश केज- शहरातील वसंत प्राथमिक शाळा केज येथील इयत्ता पहीलीत शिकणारा विद्यार्थी अवधूत गोविंद राऊत यांने एम. टी. एस. या स्पर्धा परिक्षेत गोल्ड मेडल पटकावले आहे. त्याने पहिल्याच स्पर्धा परिक्षेत 150/126 गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका, हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनी अवधूत राऊत याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पालक वर्गातूनही अभिनंदन करण्यात येत आहे.
एम.टी.एस. परीक्षेत कु. प्रीशा रोकडे राज्यात द्वितीय केज – तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवासी रामहरी धोंडीराम रोकडे यांची नात कु. प्रीशा महेश रोकडे हिने एम. टी. एस. या स्पर्धा परीक्षेत राज्यातून दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. कु. प्रीशा महेश रोकडे हि अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन प्राथमिक विद्यालयाची वर्ग दुसरीची विद्यार्थिनी आहे . एम.टी.एस.परीक्षेत राज्यातून दुसरी आलेली प्रीशा महेश रोकडे हिने 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. कु.प्रीशा रोकडे ही महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील आदर्श शिक्षक महेश रामहरी रोकडे यांची मुलगी आहे. तिला आई वर्षा रोकडे, वडील महेश रोकडे, आजोबा रामहरी रोकडे आणि योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षकांचे…