Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप होणार

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेApril 9, 2025No Comments2 Mins Read

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप होणार

गौतम बचुटे/केज –
केज येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवाचे औचित्य साधून शिक्षणासाठी पायपीट कराव्या लागत असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यांना दिपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रंजित कांबळे आहेत.

या बाबतची माहिती अशी की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दलीत आणि वंचित समाजाला सांगितले की, शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ती जे प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असा मूलमंत्र दिला. तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. दरम्यान आजही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पायपीट करावी लागते. अनेक गावात वाहनांची सोय नसते या सर्व बाबींचा विचार करून दिपक भाऊ कांबळे युवा मंचचे संस्थापक रंजित कांबळे यांनी भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना सायकली वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे, जिल्हा संघटक रविंद्र जोगदंड, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, तालुका सरचिटणीस पत्रकार गौतम बचुटे, जेष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव बनसोडे, रमेश निशिगंध, सुरज काळे, रोहीत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमात सायकलींचे वाटप करण्यात येणार :- गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम हा दि. १० एप्रिल रोजी फुले नगर येथे संपन्न होत असल्यास ” तुम्ही खाता त्या भाकरीवर ” …फेम समाजभूषण कडुबाई खरात यांच्या कार्यक्रमात सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. कडुबाई खरात यांच्या भीम गीत कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आणि उद्घघाटिका सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजलीताई घाडगे आहेत आणि प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष कबीरोद्दीन इनामदार, गोपाळ मस्के, बाळासाहेब भांगे, प्रा. धनराज भालेराव, आश्रुबा सोनवणे, रामधन हजारे, अमोल शिंदे, संदिप नाईकवाडे, प्रा. राजेश गायकवाड, संपत वाघमारे, लक्ष्मण थोरात, पत्रकार महादेव गायकवाड, गौतम बचुटे रंजीत खोडसे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन एल एफ सी ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 222
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 3
Total Users : 146043
Views Today : 1

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.