Author: विजयराज आरकडे

केजमध्ये कुणी आणली विनाकारण आनंदनगरी केज- केज पंचायत समिती मैदानावर आनंद नगरी ऐन पावसाळ्यात अवतरत आहे. यामुळे नागरीक विचार करत आहेत की, नेमके कोणत्या कारणास्तव ही आनंद नगरी सजत आहे. गणपती उत्सव, दसरा,उरूस,अशा कारणांमुळे केजकर आनंद नगरी चा आनंद घेतात मात्र ही अचानक आलेल्या आनंद नगरी मुळे, केज करांच्या आनंदावर विर्जन पडणार आहे. यामुळे बाजार उठणार, लहान बालके हट्ट करणार जाण्याचा वातावरण पावसाळी, लेकरे आजारी पडणार, नक्की कुणी दिली परवानगी, व कशासाठी हे समजून येत नसल्याने नागरीक हैराण आहेत.

Read More

विठ्ठलराव सखाराम सोनकांबळे यांच्या सातव्या पूण्यस्मरणार्थ मोफत शालेय साहित्य वाटप नांदेड येथील गोविंदेश्वर प्रा.शाळेत इ.पहिली ते सातवीच्या सर्व विद्याध्यांना विठ्ठलराव सोनकांबळे – शाखा अभियंता सिंचन भवन नांदेड यांच्या 7 व्या पुण्यस्मरणार्थ त्यांची पत्नी श्रीम सुनंदा सोनकांबळे व मुलगी वर्षा संजय इंगळे (कॉन्ट्रेक्टर) यांच्या हस्ते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वहया, पेन व इतर साहित्य वाटप करण्यात आले.वर्षा संजय इंगळे या त्यांच्या वडीलांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक क्षेत्रात असे मोठे उपक्रम राबवितात. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी त्याचे आभार मानले. यावेळी सुनंदा सोनकांबळे, वर्षा इंगळे, संध्या सिंदगिकर, किडे शोभा माधव नामवाड, पालक शरद चव्हाण सर्व विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

Read More

पंकजा मुंडे विधानपरिषद निवडणुकीत विजयी मुंबई- विधानपरिषद निवडणुकीत पंकजाताई मुंडे या विजयी झाल्या आहेत. त्यांना 26 मते मिळाली आहेत.

Read More

सराईत गुन्हेगार पापा फारोकीवर झोपडपट्टी दादा कलमानुसार केज पोलिसांची कारवाई केज :- बीड जिह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री नंदकुमार ठाकुर यांनी गुन्हेगाराची समुळ नष्ट करण्यासाठी बीड जिल्ह्यात कठोर पावले उचलेली आहेत त्यानुसार झोपडपट्टी या कायद्यानुसार अनेक गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचे चालु केले आहे या पार्श्वभुमीवर केज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन यांनी दिनांक ०६/०६/२०२४ रोजी इसम नामे उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी वय वर्ष २८ राहणार रोजामोहल्ला केज तालुका केज जिल्हा बीड यांच्या विरुद्ध झोपडपट्टी कलम अंर्तगत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत मा जिल्हादंडधिकारी साहेबाकडे सादर केला होता सदर स्थानबद्ध…

Read More

मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली साठी जाणाऱ्या स्वयंसेवकांना रंजीत आडसकर यांच्याकडून नाष्टा व पाण्याची उत्तम सोय केज- केज तालुक्यातील कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात रमेशराव आडसकर यांचा सहभाग असतो. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांचे सुपुत्र रंजित (दादा) आडसकर समाजसेवेत अग्रेसर आहेत. बीड येथे झालेल्या जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण रॅली साठी केज-बीडकडे जाणाऱ्या गाड्यासाठी बीड रोडवर नाष्टा व पाणी याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत नाष्टा व पाणी वाटप करण्यात आले. कार्यकमाची सुरुवात रंजित (दादा) आडसकर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. या उपक्रमाचे व रंजित आडसकर यांचे सर्व समाज बांधवातून…

Read More

लेकी उंच भरारी घेतील..!  मुलींचे उच्च शिक्षण मोफत करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय हा नक्कीच स्वागतार्ह आहे, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा मुलींना याचा फायदा होणार असून यामुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे प्रमाणही वाढणार आहे. उच्च शिक्षण घेऊन या जिजाऊ – सावित्रीच्या लेकी आर्थिक सक्षम होऊन नक्कीच उंच भरारी घेतील. शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत जो निर्णय घेतलेला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. शिवमती राधा सपकाळ बीड जिल्हा अध्यक्ष जिजाऊ बिग्रेड महाराष्ट्र

Read More

*खासदार बजरंग सोनवणे यांचा केज येथे भव्य सत्कार संपन्न* *माझ्या विजयाचे श्रेय आदरणीय शरदचंद्र पवार मनोजदादा जरांगे पाटील आणि मायबाप जनतेला* —- खा. बजरंग सोनवणे *ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी प्रमाणिक राहा आणि चेहरा नसण्याऱ्याना चेहरा देण्याचा काम ज्यांनी केलं त्यांना विसरता येत नाही* —- माजी मंत्री अशोकराव पाटील *गद्दार मित्र म्हणून त्यांनी त्रास दिला नसता तर बजरंग सोनवणे खा. झाले नसते !* —- महेबुब शेख गौतम बचुटे/केज :- बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खा. बजरंग सोनवणे हे खासदार पदाची शपथ घेऊन दिल्लीहून पहिल्यांदाच जिल्ह्यात पदार्पण केले त्या निमित्त त्यांचा केज नगरीत भव्य दिव्य सत्कार संपन्न झाला. सोमवार दि. ८ जुलै रोजी बीड…

Read More

हिट अँण्ड रण प्रकरण बंदोबस्त कर्तव्यावर निघालेल्या पोलिसांना कारने उडवले एक ठार, एक जखमी नेकनूर- पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्त करता कर्तव्यावर निघालेल्या दोन पोलिसांना नेकनूर जवळील बीड रोडवर मंगल कार्यालय शेजारी स्विफ्ट कारने समोरुन जोराची धडक दिली यामध्ये नेकनूर चे रहिवासी आणि सध्या दिंद्रुड येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र श्रीधर नन्नवरे वय 57 हे ठार झाले तर उपनिरीक्षक रमेश नागरगोजे गंभीर जखमी झाले . रोडच्या कडेने चाललेल्या दुचाकीला वेगतील कारने दिलेली धडक मंगल कार्यालयाच्या सीसीटीव्ही मध्ये कॅच झाली आहे. पोलीस भरतीच्या कर्तव्यावर जाताना नेकनूर जवळील बीड रोडवर असणाऱ्या मंगल कार्यालय शेजारी दुचाकी वरील एम एच 23 एके 9397 दिंद्रुड…

Read More

न. प. ने घेतलेल्या सार्वजनिक बोअरवेलचे पाणी भरण्यासाठी नागरिकांना करावे लागते जुगाड केज- न. प. च्या वतीने गत काही महिन्यांपूर्वी अनेक वार्डात शिल्लक निधीतून बोअरवेल घेतले होते. वार्ड क्रमांक 4 मध्ये ही घेण्यात आले. सुदैवाने पाणी लागलेही नागरिकांना दिलासा मिळाला परंतु जवळपास वर्ष संपत आले अद्यापही तुट्या किंवा टाकी बसवण्यात आली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक आप आपले जुगाड वापरून पाणी भरत आहेत. ऐन उन्हाळ्यात देखील या बोअरवेल ने परिसरातील नागरिकांना पाण्याचा थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतू हंडा भर पाणी भरायचे म्हणले तरी तोटी नसल्याने पाणी वाया जात आहे. टाकी नसल्याने कोणीही, केंव्हाही बोअरवेल चालू करून पाणी भरतात त्यामुळे पाणी…

Read More

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ सोहळा संपन्न *—————————————–* ५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान *============================* *केज प्रतिनिधी: दि. ६ जुलै-* जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( प्रा. वि. ) या शाळेमध्ये दि. ६ जुलै २०२४ रोजी ५ वी नवोदय, शिष्यवृत्तीधारक, एम. टी. एस. ऑलंपियाड, महाराष्ट्र टॅलेंट सर्च, सैनिकी स्कूल व इतर परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे अध्यक्ष, जी. वि. शि. मंडळ केज तसेच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती केज, तर प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More