तृतीयपंथी(गार्गी) नर्तिकेचा लॉजवर म्रतदेह आढळला..!
केज पोलिस ॲक्शन मोडवर
गौतम बचुटे/केज :-
केज तालुक्यातील एका कला केंद्रावर काम करीत असलेल्या तृतीय पंथी नर्तिकेचा मस्साजोग येथील लॉजवर गळफास घेउन मृत्यू झाला असल्याचा म्रतदेह आढळला आहे.
या बाबतची माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील केडगाव येथील ओंकार उर्फ गार्गी बबन ढलपे हा तृतीय पंथी बीड मांजरसुंबा रोड वरील सारुळ फाटा रेणुका कला केंद्रावर गायिका व नर्तिका कलाकार म्हणून काम करीत होता.
गार्गी हीचा मस्साजोग येथील अजिंक्य हॉटेल अँड लॉजवर दिनांक १६ ऑगस्ट रोजी पहाटे ५:०० वाजता कर्मचाऱ्यांना खोलीत फॅनच्या हुकाला ओढणीने मृतदेह लटकलेला आढळला.
लॉजवरील नोकरांनी ही माहिती पोलिसांना दिल्या नंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक कादरी, पोलीस जमादार दत्तात्रय बिक्कड, पोलीस नाईक संतोष गित्ते, पोलीस नाईक मतीन शेख यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला. शवविच्छेदना नंतर नातेवाईक व तृतीय पंथी यांनी केज येथील सार्वजनिक स्मशान भूमीत अंतिम संस्कार केले.
या प्रकरणी केज पोलीस कसून तपास करत आहेत, नंतरच सविस्तर माहिती समोर येईल..!
