Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज तालुक्यात काळवीटाची शिकार : वन विभागाने घेतले सहा संशयितांना ताब्यात

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 16, 2024No Comments2 Mins Read

केज तालुक्यात काळवीटाची शिकार : वन विभागाने घेतले सहा संशयितांना ताब्यात

गौतम बचुटे/केज (बीड) :- काळवीटाची शिकार करून त्याचे मांस व चमड्याची तस्करी करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सहा संशयित आरोपींना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्या रॅकेट मधील आणखी काहीजण हाती लागण्याची शक्यता आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील केकत सारणी येथील शिवारात काळवीट जाळ्यात पकडुन त्याची मान धारदार शस्त्राने कापून शिकार झाल्याची माहिती पोलिसांनी धारूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तम चिकटे यांच्या आदेशाने वन रक्षक वचिष्ट भालेराव, वाहन चालक शाम गायसमुद्रे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी येथील सहा शिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्या कडून शिकारीचे साहित्य व मान कापून जिवे मारलेले सुमारे चार वर्ष वयाचे मृत काळवीट ताब्यात घेतले.

मृत काळविटाचे चंदनसावरगाव येथील पशू वैद्यकीय दवाखाना श्रेणी क्र-२ मध्ये पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पी. थकळरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. पी. मसने, डॉ. प्राजक्ता भोळे, डॉ. अनिकेत काटोळे, डॉ. प्रितम आचार्य आणि गुंड यांच्या पथकाने काळविटाचे शवविच्छेदन केले. अधिक तपासासाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.

या काळवीट शिकार प्रकरणी वनविभाग शिकाऱ्यावर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम १९९७२ नुसार कारवाई करणार आहे. तर केज तालुक्यात हरिनाची शिकार होत असून त्याचे मांस व कातडी याची शिकार करणारे याचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाने त्या सर्वांना ताब्यात घेवून कठोर कारवाई करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी नागरिक यांच्याकडून होत आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 44
विजयराज आरकडे

Related Posts

निवेदन देण्यासाठी आलेल्या रसूल बाबांचा हृदयविकाराने मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून कुटुंबाला ५ लाखांची मदत

May 30, 2026

केज येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न; युवकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग;

May 28, 2026

केज तालुक्यातील वादळी पावसामुळे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी – युवा नेते ऋषीकेशभैय्या आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना दिले निवेदन

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 7 1 3 0
Total Users : 147130
Views Today : 7

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.