Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्मृतींचा अजूनही दरवळ…!

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेAugust 13, 2024Updated:August 13, 2024No Comments3 Mins Read

माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्मृतींचा अजूनही दरवळ…!

आज माजी आमदार लोकनेते बाबुराव आडसकर साहेबांचा आठवा स्मृती दिन.आठ वर्षांनंतरही स्मृतींचा दरवळ कायम असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी अनेकांची घरे फुलवली.तालुक्यातील सर्व सामान्य माणसाच्या हाताला रोजगार तर पदवीधरांना नौकरी दिली.
केज तालुका म्हटले की स्व.बाबुरावजी आडसकर व त्यांचा “हाबाडा” हे शब्द आठवतात. केज तालुक्याच्या नकाशातील एक छोटेसे गांव म्हणजे आडस.या गांवाला संपुर्ण महाराष्ट्रात एक वेगळी ओळख माजी आमदार स्व.बाबुराव आडसकर यांनी मिळवुन दिली . 1964 मध्ये केज पंचायत समितीचे सभापती म्हणुन काम करतांना ग्रामिण प्रश्नांची खरी नस त्यांना सापडली होती.1960 च्या दशकात दळणवळणाची सोय नाही.वृतपञाचा बोलबाला नाही.दुरसंचार माध्यमातुन फोनची सुविधा अपुरीच होती.अशा काळात संपुर्ण केज अंबाजोगाई परिसर साहेबांनी सायकलवरुन पिंजुन काढलाहे विशेष होय.खेडोपाडी आडसकरांनी आपला रुणानुबंध निर्माण केला.
कुठलाही कार्यकर्ता असो त्याला त्याचे प्रश्न विचारुन त्याला सन्मानाने व समाधानाने ते काम करुनच परत पाठवत असत.त्यांच्या या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे व काम करण्याच्या धडाडीमुळे प्रत्येक गांवात त्यांच्या कामाचा ठसा निर्माण होत असे.त्याचे बोलके उदाहरण म्हणजे 1972 ची केज विधान सभेची निवडणुक होय.केजच्या सर्वसाधारण मतदार संघातुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आडसकरांना उमेदवारी मिळाली होती.तर त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील प्रसिध्द विचारवंत कै.बापुसाहेब काळदाते यांना उमेदवारी प्रजा समाजवादी पक्षाने दिली.या लढतीकडे महाराष्ट्राचेच नव्हे तर भारत देशाचे लक्ष या लढतीकडे होते.अनेक राजकीय विचारवंत व पञकारांचे अंदाज खोटे ठरवत या मध्ये आडसकर साहेबांनी 38416 मते घेवुन समाजवादी नेते काळदाते यांचा पराभव केला होता.अगदी देशाच्या संसदेतही काळदातेंना पाडणारा माणुस कोण आहे हा प्रश्न पडला होता. केज ची ही निवडणुक मराठवाड्याच्या राजकीय इतिहासात महत्वपुर्ण ठरली याचे कारण म्हणजे बाबुराव आडसकर साहेबांवर प्रेम करणारी ग्रामिण जनता होय.त्यांनी दिलेला *हाबाडा* हा शब्द कुठल्याही इलेक्शन मध्ये चर्चिला जातो.हा त्यांच्या बोली भाषेतला शब्द राजकारणात खुपच रुढ झाला.
कडक टोपी,भारदार मिश्या ,पांढराशुभ्र सदरा ,धोती व या बरोबरच जॕकेट घालुन वाड्यावर बसलेले साहेब …त्यांच्या शेजारी एक टेली फोन ,पान सुपारीचे तबक ,व समोर बसलेले पंचक्रोशीतील शेतकरी व शेतमजुर…! प्रश्न ऐकुन त्याच ठिकाणी तहसील ,एमइसिबी ,पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांना फोन करुन प्रश्नांची सोडवणुक करत.चहा घेतल्याशिवाय कोणीही जाणार नाही याची ते काळजी घेत असत.म्हणुनच तर ते जनतेच्या मनात घर करुन राहिले होते.
अनेकांची घर संसारे त्यांनी अंबाजोगाइ सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन फुलविली होती. 1953 मध्ये श्री.छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस या शिक्षण संस्थेची स्थापना ही एक शैक्षणिक नांदी ठरली.बालाघाटातील डोंगर रांगेतील देवळा , चोंडी,आसरडोह,साळेगांव,चंदन सावरगाव,कळमअंबा,आडस,आसरडोह, या सारख्या खेड्यातही माध्यमिक शिक्षण पोहचविले.भुमी पुञांना न्याय देण्याचे काम केले.केज तालुक्यात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणाची मुहुर्त मेढ रोवली. बालाघाटाच्या डोंगर रांगातील चोंढी ते देवळा व धारुर ,केज व अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांत माध्यमिक विद्यालये सुरु केली. उच्च शिक्षणासाठी ही ते आग्रही असल्यामुळे 1990 ला वसंत वरिष्ठ महाविद्यालय ( सध्याचे बाबुरावजी आडसकर वरिष्ठ महाविद्यालय ) केज व छ.शिवाजी वरिष्ठ महाविद्यालय आडस हे शैक्षणिक संकुल निर्माण केले. वसंत कनिष्ठ व छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातुनही अनेक विद्यार्थी वैद्यकीय व अभियांञिकी शिक्षणासाठी प्राप्त झाले आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मा.रमेशराव आडसकर यांनी केज ,धारुर व कळंब येथे सीबीएसई चे शारदा इंग्लीश स्कुल व वसंत पाॕलिटेक्निक व वसंत फार्मसी कॉलेजची सुरूवात केली.
दि.12 आगस्ट 2016 ला काळाने घाला घातला.हा दिवस मराठवाड्याच्या राजकीय व शैक्षणिक क्षेञासाठी दुःखाची वेदना घेवुन आला. केज ,अंबाजोगाई व धारुर तालुक्याच्या राजकारणात ग्रामिण भागातील शेतकरी व शेतमजुर यांचे प्रश्न घेवुन लढणारे माजी आमदार बाबुराव आडसकर यांचे दुःखद निधन झाले .
बंधुअॕड. मेघराज आडसकर व तात्यांच्या निधनानंतर एकाकी रमेशराव आडसकर खचले नाहीत .कौटुंबिक धक्क्यानंतर ही ते सावरले. 2019 ला माजलगांव मतदार संघातुन झालेला निसटता पराभव येणाऱ्या काळात निश्चितपणे यश खेचुन आणल्याशिवाय राहणार नाही. तात्यांच्या या कर्मयोगी आयुष्यामुळे अनेकांच्या आयुष्याचे नंदनवन झाले आहे हे विसरता येणार नाही. माणुस माणसांपासुन दुर जात असतांना त्यांनी जोडलेली गर्दी आज ही लोकांच्या स्मरणात आहे..! त्यांचा सर्व सामान्य माणसांचा दरबार आजही जनतेच्या मनात कायम घर करुन आहे. तात्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..

प्रो. बी. जे. हिरवे

विजयराज आरकडे

Post Views: 44
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.