पंकजाताई मुंडे यांना भाजपाकडून मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता पक्षाकडून फोनवरून माहिती दिली असल्याची चर्चा मुंबई- भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्यातील प्रभावी व्यक्तीमत्व पंकजाताई मुंडे यांना भाजपा पक्षाकडून फोनवरून मंत्रीमंडळात समाविष्ट केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली असल्याचे वृत्तवाहिनी वरून सांगण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या प्रचाराने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात सभा घेऊन आमदार निवडून आणले आहेत. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यातील मंत्रीमंडळात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे समजते.
Author: विजयराज आरकडे
देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मा.खासदार पाटील केज . – तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या वेदनादायी आहे. घटनेच्या सात दिवसानंतरही सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण संसदेत हा विषय लावून धरू अशी भावना खासदार रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शनिवारी खासदार रजनी पाटील यांनी भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर रजनी पाटील यांनी आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत असे सांगितले. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार…
अपघाती निधन झालेला मित्र राहुल मुंडे नावाने प्रतिष्ठानची स्थापना ; दत्त जयंती सामाजिक उपक्रमाने केली साजरी; सर्वत्र होत आहे कौतुक केज- प्रतिनिधी केज शहरातील शिक्षक कॉलनी भागातील कर्तबगार युवक राहुल प्रकाश मुंडे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद अपघाती निधन झाले आहे. राहुल मुंडे हा कर्तबगार युवा तरूण होता. त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुल मुंडे चा मोठा मित्र परिवार आहे. या सर्व राहुल च्या जिवलग मित्रांनी राहुल मुंडे प्रतिष्ठान ची स्थापना केली आहे. राहुल प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस या तरुण युवकांनी राहुल प्रतिष्ठानची स्थापना करताना व्यक्त केला होता.याकामी त्यांना एम.डी घुले सर, सुधाकर ढाकणे…
केज कडकडीत बंद केज- सकल मराठा समाजाच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेध नोंदवून फरार आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यास संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी, नागरिक यांनी प्रतिसाद देत बंदला पाठींबा दिला. ज्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे ही अमानवीय घटना घडली आहे. केज सह तालुक्यात कडकडीत बंद पाहावयास मिळाला, शाळा, दुकाने, खाजगी व्यवसाय नागरीकांनी स्वंयमपने बंद ठेऊन बंदला आपला पाठिंबा दिला आहे. शहरातून सकल मराठा युवकांनी पायी फिरून बंदचे आवाहन करत केज पोलीस ठाण्यात जाऊन फरार आरोपींना अटक करा या मागणीसाठी घोषणाबाजी देखील केली आहे.
*ओजस अनिल कुलकर्णी ची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड* माजलगाव:- नोबेल फांऊडेशन आणि भवरलाल जैन फांऊडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) ही परीक्षा घेतली जाते, यात प्रथम पात्रता परीक्षा नंतर लेखी परीक्षा आणि त्यात निवड होणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांची मुलाखत परीक्षा घेतली जाते, या तिन्ही अडथळ्यांच्या परीक्षा पूर्ण केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थ्यांची निवड केली जाते, या परीक्षेत यश मिळवून निवडलेल्या विद्यार्थ्यांना या फाऊंडेशन मार्फत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येतेच परंतु या बाल वैज्ञानिकांना इस्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्र या ठिकाणी अभ्यास सहलीला जाण्याची संधी मिळते.शहरातील सिंधफणा पब्लिक स्कुल माजलगाव याठिकाणी इ.8वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि.ओजस…
सरपंच देशमुख खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात ; बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केज – जिल्हा हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरण तपासात पोलिसांनी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या. प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता.…
सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणातील आज पर्यंतच्या काही ठळक घडामोडी..! मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे पवनचक्की येथे झालेल्या वादातून दि. ९ रोजी अपहरण करून हत्या ; या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला मस्साजोग येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक भूमिका घेत मस्साजोग येथे दि. ९ च्या रात्रीपासून महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना पकडल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी भूमिका घेतली. दि. १० रोजी या घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको करण्यात आला. याला तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, तरून, नागरिक यांनी सहभाग घेतला. आक्रमक जमावाने केज व मस्साजोग…
केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केज- काल दि. ९ रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्वत्र निषेध नोंदवून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. याच मागणी साठी व हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला आहे. मस्साजोग येथेही सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. तेथेही रस्ता रोको सुरू आहे.
युवा नेतृत्व संतोष देशमुख यांचे अपहरण ; काही तासाने आढळला मृतदेह ; केज- तालुक्यातील मस्साजोग येथील युवा नेतृत्व व माजी सरपंच पती संतोष देशमुख यांचे काही अज्ञाताने दुपारी अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही तासानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली असून कर्तृत्वान युवा कार्यकर्ता गेल्याने मस्साजोग व तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवून गाडीची तोडफोड करून संतोष देशमुख यांचे अपहरण केले असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात…
केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार- हारूणभाई इनामदार केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे-सौ.सीताताई बनसोड केज/प्रतिनिधी केज नगरपंचायत अंतर्गत महा स्वच्छता अभियान २०२४ स्वच्छता पंधरवाडा मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन केज नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला आहे. नगरपंचायत आपल्या दारी या अभियाना अंतर्गत नागरिकांचे विविध प्रश्न सोडविणार आहोत असे प्रतिपादन हारूणभाई इनामदार यांनी केले आहे तर केज शहरातील सुजान नागरिकांनी स्वच्छता मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड यांनी केले आहे. केज नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ संरक्षण…