सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणातील आज पर्यंतच्या काही ठळक घडामोडी..!
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे पवनचक्की येथे झालेल्या वादातून दि. ९ रोजी अपहरण करून हत्या ;
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला
मस्साजोग येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक भूमिका घेत मस्साजोग येथे दि. ९ च्या रात्रीपासून महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना पकडल्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी भूमिका घेतली.
दि. १० रोजी या घटनेच्या निषेधार्थ केज शहर कडकडीत बंद ठेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्ता रोको करण्यात आला. याला तालुक्यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, तरून, नागरिक यांनी सहभाग घेतला.
आक्रमक जमावाने केज व मस्साजोग परिसरात बसची केली तोडफोड
मनोज जरांगे पाटील यांची दि. १० रोजी सायंकाळी मस्साजोग, केज येथे आंदोलकांशी भेट घेऊन आरोपी पकडण्यासाठी प्रशासनाला दिला काही दिवसांचा कालावधी ;
दोन आरोपी ताब्यात घेतले असल्याची पोलीसांनी दिली माहिती, तर बाकी आरोपी पकडून कठोर कारवाई करण्याचे दिले आश्वासन
आंदोलकांच्या मागणीनुसार पि.आय. महाजन, पि. एस आय. पाटील यांचे पोलीस खात्याच्या वरिष्ठांनी तडकाफडकी निलंबन केले
सरपंच संतोष देशमुख यांचा दि. १० रोजी मस्साजोग येथे रात्री उशिरा करण्यात आला अंत्यसंस्कार
खा. रजनीताई पाटील
खा. बजरंग सोनवणे,
आ. नमिताताई मुंदडा यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर
मा. रमेशराव आडसकर
मा. आ. पृथ्वीराज साठे,
मा. रणजितसिंह पाटील,
मा. हारूणभाई इनामदार,
मा. नगराध्यक्षा सिताताई बनसोड
मा. भाई मोहन गुंड,
मा. सुमंत धस,
सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले या सर्वांनी केज, मस्साजोग येथील आंदोलन स्थळी व देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करून आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी व झालेली घटना निंदनीय आहे परंतू या घटनेला जातीय रंग देऊ नये आरोपींनी केलेले कृत्ये माफी लायक नसल्याने त्यांना ताबडतोब अटक करून जलदगतीने प्रकरण चालवून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशा भावना व्यक्त केल्या. यापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे तसेच तालुक्यातील जनतेने यापुढेही सामाजिक सलोखा कायम ठेऊन एकमेकांशी वागावे असेही आवाहन केले आहे.
दि. ११ रोजी या हत्ये प्रकरणातील तिसरा आरोपीला अटक
