केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी
केज-
काल दि. ९ रोजी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.
या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्वत्र निषेध नोंदवून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
याच मागणी साठी व हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला आहे.
मस्साजोग येथेही सर्व ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले आहेत. तेथेही रस्ता रोको सुरू आहे.
