देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – मा.खासदार पाटील
केज . –
तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या वेदनादायी आहे. घटनेच्या सात दिवसानंतरही सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण संसदेत हा विषय लावून धरू अशी भावना खासदार रजनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शनिवारी खासदार रजनी पाटील यांनी भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर रजनी पाटील यांनी आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत असे सांगितले. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असेही पाटील म्हणाल्या. खासदार रजनीताई पाटील यांनी तेथूनच बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणातील सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा नाहीतर जन आक्रोश थांबणार नाही असे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले.
देशमुख कुटुंबाची भेट घेताना खासदार रजनी पाटील यांना अश्रू अनावर झाले होते.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, काँग्रेस चे जेष्ठ नेते नवनाथ थोटे, हनुमंत मोरे, केज तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रवीण कुमार शेप, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष मिनाक्षी पांडुळे यांची उपस्थिती होती.
