केज कडकडीत बंद
केज-
सकल मराठा समाजाच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेध नोंदवून फरार आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यावे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यास संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी, नागरिक यांनी प्रतिसाद देत बंदला पाठींबा दिला.
ज्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे ही अमानवीय घटना घडली आहे. केज सह तालुक्यात कडकडीत बंद पाहावयास मिळाला, शाळा, दुकाने, खाजगी व्यवसाय नागरीकांनी स्वंयमपने बंद ठेऊन बंदला आपला पाठिंबा दिला आहे.
शहरातून सकल मराठा युवकांनी पायी फिरून बंदचे आवाहन करत केज पोलीस ठाण्यात जाऊन फरार आरोपींना अटक करा या मागणीसाठी घोषणाबाजी देखील केली आहे.
