ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांचा स्तुत्य उपक्रम; केज!! प्रतिनिधी केज तालुक्यातील सोनिजवळा येथील रमेशराव आडसकर यांचे कट्टर समर्थक तथा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल व देविदास जोगदंड यांनी स्वखर्चाने गावातील नागरिकांसाठी मोफत टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे या बाबत सविस्तर वृत्त असे की सोनिजवळा येथे गेल्या 30 वर्षांपासून धनेगाव पाणी पुरवठा करणारी योजना सुरू होती परंतु त्या योजनेला बराचसा कालावधी झाल्याने ती पाइपलाइन जिर्ण झाली आहे त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. शासनाने जलजिवन मिशन योजने अंतर्गत जवळबंन येथील जलकुंभातुन सोनिजवळा गावांसाठी 4 कोटी 13 लाख रुपये किंमतीची योजना 2023 मध्ये मंजूर करण्यात आली होती व त्यां…
Author: विजयराज आरकडे
कानडी रोड- उमरी रोड संलग्न वार्डात भिषण पाणी टंचाई; न. प. प्रशासन व नगरसेवक भुताने झपाटल्या सारखे शांत; या भागातून मोठे जन आंदोलन उभे रहाणार असल्याची चर्चा; केज – नगरपंचायत मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने केलेला घरकुल घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. महाराष्ट्रामध्ये घरकुल घोटाळ्याची चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी मात्र बेफिकीर असून केज शहराला पाण्याचे मोठे संकट असतानाही कसल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत यांना भुताने झपाटल्या सारखे का शांत झाले आहेत. का भ्रष्टाचार व नागरी वस्ती सोडून सुरू असलेल्या कामातून आयता मलिदा मिळत असल्याने बेफिकीर झाले आहेत. अशी चर्चा नागरीक करत असून याभातून लवकरच मोठे जन आंदोलन उभे…
अखिल भा. म. पत्रकार परिषद महिला- शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनानिमित्त महिला रणरागिणीचा सन्मान सोहळा संपन्न; प्रतिनीधी – लोणावळा येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा महिला पत्रकार व लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार व रणरागिणीना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरवात महिलादिन विशेष काव्य मैफिलीने करण्यात आली सादरकर्त युवा साहित्य प्रतिष्ठान मुंबई. कवी संतोष खरटमोल कवी आनंद रांजणे कवी ओमकार देसाई कवीयत्री सविता देशमुख यांनी अप्रतिम से कवी मैफिल जमवली त्यात एक छोटी कलाकार मृण्मई काळे व शोभा आहेर यांनी सुंदर कविता सादर केली स्वागत गीत सुनिल मस्के यांनी आपल्या सुरेख व…
केज तालुक्यात टॉवरची तार चोरी करताना भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू; गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात पुण्याहून टॉवरच्या तार चोरी करण्यासाठी आलेल्या टोळीतील दोघांचा लोखंडी टॉवर तुटून मृत्यू झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाल्यास त्या दोघांचे प्रेत एका इर्टिगा कार मध्ये घेऊन ते परभणी ते येथे गेले. परभणी येथे गेल्या नंतर मृतदेहा सोबत आलेल्या साथीदार पळून गेल्याने ईर्टिगा चालकाने दोन्ही मृतदेह ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केल्या नंतर घटना उघडकीस आली. दि. २९ मार्च रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मेदनकरवाडी येथील अविनाश पटोळे वय १७ वर्ष, आकाश श्रीराम आडे आणि त्यांचे साथीदार हे सुरज श्रीराम…
भीषण अपघातात माय-लेकराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू; साळेगाव येथील पुरी कुटुंबावर काळाचा घाला; प्रकाश मुंडे- विषेश प्रतिनिधी:- आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर आज एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोर धडक इतकी भीषण होती की, कारमधील माय-लेकराचा जागीच होरपळून मृत्यू झाला.आष्टी पंचायत समितीचे ग्रामसेवक तथा प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी पुरी महाराज यांच्या पत्नी आणि मुलावर हा काळाने घाला घातला आहे. ◆नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील साळेगाव येथील ह.भ.प.श्रीहरी पुरी महाराज यांची पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी वय ४२ आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी वय २५ हे कारने आष्टीकडून बीडकडे जात होते.कापसी फाट्याजवळ समोरून…
ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार युवराज हिरवे यांना जाहीर; केज – प्रतिनिधी तालुक्यातील कळंबआंबा येथील भूमिपुत्र ,मानेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्र मुख्याध्यापक युवराज अभिमन्यू हिरवे यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. शिक्षण क्षेत्रातील सातत्य पूर्ण कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कायम धडपड, विविध शैक्षणिक उपक्रमातील नाविन्यता, सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदान शाळा परिसर व गाव परिसर 500 च्या वर झाडे लावुन संगोपन केले. लोकसहभागातुन विद्यार्थ्यांना लॅपटॉप संगणक दिले.शाळा परिसर तंबाखूमुक्त केला व तालुक्यातील शाळा परिसर तंबाखुमुक्त करण्यासाठी तालुका समन्वयक म्हणुन कार्य…
आडस येथे सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी उत्साहात; आडस- येथील मर्कज मस्जिद येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आडसकर साहेब यांच्या परिवारातर्फे पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्व जाती-धर्मातील लोकांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील मुस्लिम, हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक इफ्तारचा आनंद घेतला. यावेळी अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. रमेशराव आडसकर साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत रोजाचे महत्व सांगितले आणि सर्वांना ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम प्रसंगी गावचे चेअरमन श्री. उद्धवराव इंगोले, जि.प. चे माजी सदस्य श्री. भागवराव नेटके, युवा नेते मा. शशीभैय्या आडसकर, उपसरपंच श्री. गोविंद पाटील, माजी सरपंच श्री. बाळासाहेब काका…
धारुरच्या जनता दरबारात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेबांकडे उपसरपंच तुषार खुळे यांनी मांडली कोळ पिंपरी रस्त्याची कैफियत..! धारूर- (प्रतिनिधी) मौजे कोळ पिंपरी ता.धारूर जि.बीड येथील कोळ पिंपरी बस स्टँड राष्ट्रीय महामार्ग 232 ते कोळ पिंपरी गाव हा 1.2 किमी असुन मागील अनेक वर्षांपासून तो नादुरुस्त व अनेक खाच खळगे असलेला झाला आहे.याच रस्त्यावर जि.प.शाळा,माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांना दररोजच्या त्रासाला सामोरे जावे लागते.तसेच गर्भवती महिला व रुग्णाला धारुर ला नेण्यासाठी हा रस्ता असुन अडचण नसुन खोळंबा झाला आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपसरपंच तुषार विजयकुमार खुळे यांनी माननिय कार्यकारी अभियंता,बांधकाम विभागास तिन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते.आज धारुर येथील जनता दरबारात ही जिल्हाधिकारी मा.विवेक जॉन्सन…
केज मांजरसुंबा रोडवर बर्निंग बसचा थरार ! केज जवळ ट्रॅव्हल्स ची बस पलटी : बस पलटी होताच बसने पेट घेतला : २८ प्रवासी जखमी गौतम बचुटे/केज :- केज-मांजरसुंबा रोडवर सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वा. च्या सुमारास केज पासून जवळ सांगवी-सारणी वळणावर एक ट्रॅव्हल्स बस पलटी झाली आहे. बस पलटी होताच बसने पेट घेतला. अपघातात २८ प्रवाशी जखमी झाले आहेत. दि. १६ मार्च, सोमवार रोजी मध्यरात्री २:३० वाजण्याच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जात असलेली भरधाव वेगातील खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस ही केज मांजरसुंबा रोडवर असलेल्या सांगवी-सारणीच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस मधील जखमी प्रवासी बाहेर पडत असताना…
आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; बोरगाव (बु) : काल स्व. रेखा भगवान गोदाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव धनंजय गोदाम व सून सोनल गोदाम या दांपत्याने जि.प. शाळा बोरगाव (बु) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून आईच्या स्मृतींना अभिवादन केले. स्व. रेखा गोदाम यांनी प्राथमिक शिक्षण याच शाळेत घेतले होते. त्यांच्या स्मरणार्थ गेल्या चार वर्षांपासून धनंजय व सोनल गोदाम हे दांपत्य मुंबई-खारघर येथून दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या आदर्श उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ तसेच नातेवाईकांनी गोदाम दांपत्याचे कौतुक केले. यावेळी बन्सी अप्पा आरकडे, संग्राम आरकडे, विजय…