खा. समर्थक विद्यमान सरपंच गोविंद ससाणे यांचा रा. कॉ.पा. मध्ये प्रवेश केज- तालुक्यातील सोनीजवळा येथील विद्यमान सरपंच गोविंद ससाणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या उपस्थितीत बीड येथे जाहीर प्रवेश केला आहे. खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या गटातून ते निवडणूक लढवून सरपंच पदी विराजमान झाले होते. खा. सोनवणे यांना या माध्यमातून हाबाडा बसल्याचे बोलले जात आहे.
Author: विजयराज आरकडे
फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायतला हस्तांतरित , केज वासियांसाठी आनंदाचा क्षण– गटनेते हारुणभाई इनामदार केज- केज नगरपंचायत चे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेते हारुणभाई इनामदार यांनी आज केज येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती . सदरील पञकार परिषदेला गटनेते हरूनभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड, नगरसेविका पदमीनबाई शिंदे ,राजू इनामदार ,जलालभाई इनामदार व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत त्यांनी केज शहरातील मोक्याची जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शिफारशीनुसार हस्तांतरित झाली असल्याची माहिती दिली . केज शहरातील व्यापाऱ्यांना यामुळे व्यापारी संकुलाच्या माध्यमातून स्वस्थ दरात नगरपंचायत कडून गाळे व दुकानासाठी जागा मिळण्याचा…
बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद वतीने सरस्वती महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण केज- वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून लोक चळवळीच्या माध्यमातून पुन्हा नव्याने समृद्ध पर्यावरणाची निर्मिती करणे शक्य असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. ते केज येथील सरस्वती महाविद्यालय केज येथे बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलोयी युनियन औरंगाबाद यांच्या चौदाव्या द्विवार्षिक अधिवेशनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम पाटील हे होते. तर प्रा. डॉ. वैशाली आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपण बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ व समृद्ध पर्यावरण देणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगितले.…
गंगामाऊली शुगर केज मार्फत शेतकरी अभ्यास दौरा संपन्न…..! केज – गंगामाऊली शुगर कारखान्या मार्फत दि.११ सप्टेंबर रोजी कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे एकरी उत्पादन वाढीकरीता सुधारित ऊस जाती व पुर्व हंगामी ऊस लागवडीचे महत्त्व, लागवड पद्धतीमुळे ऊस उत्पादनात होणारी वाढ याबाबत माहिती देण्याकरिता कृषी भूषण पांडुरंग आवाड आ. शिरपुरा येथे त्यांच्या ऊस प्लॉटवर प्रत्यक्ष ऊस शेतीमध्ये वेगवेगळे केलेले प्रयोग, सुधारित ऊस जाती याबाबत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास दौऱ्या मध्ये पांडुरंग आव्हाड यांनी शेतकऱ्यांना पूर्व हंगामी ऊस लागवड व सुधारित ऊस जातींचे प्रत्यक्ष प्लॉट दाखवुन या बाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर आपेगाव येथील प्रयोगशील…
चार लाख रु. असलेली पिशवी हिसकावून फरार झालेले आरोपी पोलिसांनी घेतले ताब्यात ! आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी गौतम बचुटे/केज : केज येथील सरकारी दवाखान्या जवळ चार लाख रु पिशवीत ठेवून मोटार सायकवरून गावाकडे जात असलेल्या ऊसतोड मुकादमाच्या हातातील चार लाख रु. असलेली पिशवी, मोटार सायकल वरून आलेल्या दोघांनी हिसकावून घेत पळून गेलेल्या आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टी भागातील आरोपींना परभणी येथील कारागृह प्रशासना कडून ताब्यात घेत प्रकरणाचा तपास लावला आहे. २९ जुलै रोजी केज येथून तिघेजण चार लाख रु. घेऊन आडस जवळील मानेवाडीकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावर केज येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालया जवळ मोटार सायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी ४ लाखाची रक्कम…
जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न; भौतिक सुविधांपेक्षाही शिक्षकाकडे असणारी निष्ठा जास्त महत्त्वाची असते- कौतिकराव ठाले पाटील कांतराव गाजरे, शिवाजीराव समुद्रे, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण देशमुख, दत्ता सत्वधर, गणेश भालेकर हे ठरले आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी. केज प्रतिनिधी- जीवन विकास शिक्षण मंडळ ” या नावातूनच संस्थेच्या संस्थापकांची ध्येय उद्दिष्टे स्पष्ट होतात. व्यक्तीजीवन, समाजजीवन व राष्ट्रजीवन सुधारण्यासाठी उत्कृष्ट विद्यार्थी या शाळेच्या माध्यमातून घडवले जातात. एखाद्या शिक्षकाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्याच्या नावे आदर्श शिक्षक पुरस्कार देणारी तसेच विविध ध्येय उद्दिष्टे समोर ठेवून चालणारी ही नावलौकिक शाळा आहे. भौतिक सुविधांपेक्षाही शिक्षकाकडे असणारी निष्ठा जास्त…
राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज आयोजित गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा; केज- केज शहरातील शिक्षक कॉलनी, बीड रोड केज येथे राहुल प्रतिष्ठान आयोजित पारंपरिक मानाचा गणेश मंडळाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने एकजुटीने साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील संस्कृतीचे जतन करून कुठलाही धांगडधिंगा न करता व गणेश उत्सवाचे पावित्र्य राखून राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज ने एक आदर्श निर्माण केला आहे. दहा दिवस चालणारा उत्सव पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करून,रोज सकाळी, संध्याकाळी श्री. व सौ. यांच्या हस्ते आरती करण्यात आली. महिला भजनी मंडळ, काकड आरती, व विविध प्रकारचे भजन गाणी महिला भजनी मंडळींनी एकत्र घेऊन या राहुल प्रतिष्ठान शिक्षक कॉलनी केज आयोजित गणेश…
जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन साहेब यांच्या हस्ते क्रिडा प्रशिक्षक विनोद गुंड सर सन्मानित बीड- बीड जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या मान्यवर क्रीडा संघटक व क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा संयोजक म्हणून कामगिरी केल्याबद्दल अनेकांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये केज येथील जेष्ठ खेळाडू तथा क्रिडा प्रशिक्षक विनोद गुंड सर यांचाही दि.29 ऑगस्ट 2025 या राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त बीडचे जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन साहेब यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. अरविंद विद्यागर साहेब प्रा. जनार्दन शेळके सर वया कार्यक्रमाला बीड जिल्हातील खेळाडू…
केज-बीड मार्गावरील उमरी टोल नाका सुरु; केज तालुक्यातील स्थानिक नागरिकांनी पास चा लाभ घ्यावा.- सुमंत धस केज ते बीड रस्त्यावर नव्याने कार्यान्वित झालेला टोल नाका सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू आहे. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी आता आपला ‘स्थानिक पास’ अनिवार्यपणे घ्यावा, अन्यथा त्यांना प्रत्येक वेळी टोल भरावा लागेल.एक बाजूच्या प्रवासाला चार चाकी वाहनाला ८५ रुपये मोजावे लागणार आहेत,दिवसातून अनेक वेळेस टोल वरून प्रवास करणारे अनेक वाहने केज तालुक्यातील आहेत त्या मुळे पास नसेल तर त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे,पैश्यांची बचत व्हावी यासाठी स्थानिक नागरिकांनी ३५० रुपयांचा महिन्याचा पास काढावा. तसेच रोड वर कुठे अपघात झाला तर जखमींना…
अक्षय जाधव यांचे नीट पीजी मध्ये घवघवीत यश केज – केज येथील भूमिपुत्र अक्षय अविनाश जाधव यांनी नीट पीजी करिता ऑल इंडिया रँक 1569 क्रमांक मिळवला आहे. संभाजीनगर घाटी इथे शिक्षण घेताना ही रँक मिळवली आहे. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी ही गुणवत्ता महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल खा रजनीताई अशोकराव पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य दादा पाटील,प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.