Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

शिवशंभु युवा प्रतिष्ठान व जनविकास फाउंडेशनतर्फे केजमध्ये भव्य शारदीय नवरात्र महोत्सव – स्वर्णगिरी मंदिर देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 29, 2025No Comments1 Min Read

शिवशंभु युवा प्रतिष्ठान व जनविकास फाउंडेशनतर्फे केजमध्ये भव्य शारदीय नवरात्र महोत्सव – स्वर्णगिरी मंदिर देखावा आकर्षणाचे केंद्रबिंदू

केज (प्रतिनिधी) – शिवशंभु युवा प्रतिष्ठान, समर्थनगर व जनविकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरात यंदा प्रथमच शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त स्वर्णगिरी मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला असून, तो शहरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

समर्थनगर येथे उभारण्यात आलेल्या या देखाव्याला महिला, लहान मुले व तरुण वर्ग मोठ्या संख्येने भेट देत आहेत. धार्मिक वातावरण, पारंपरिक सजावट व भक्तिभावाने भारलेली संध्याकाळ या देखाव्याच्या ठिकाणी अनुभवता येत आहे.

महोत्सवात दररोज महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्या टिपरी नृत्य, भक्तीगीत, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण भक्तिमय करत आहेत. आयोजकांनी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले असून, त्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचे जतन करतानाच महिलांना मंच मिळवून देण्याचे कार्य आयोजक संस्था करत असल्याने शिवशंभु प्रतिष्ठान समर्थनगर येथील आयोजन समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हा उपक्रम शहरवासीयांसाठी एक पर्वणी ठरत असून, पुढील काही दिवसांतही मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांनी या देखाव्याला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 105
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 6
Total Users : 146046
Views Today : 5

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.