फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायतला हस्तांतरित ,
केज वासियांसाठी आनंदाचा क्षण–
गटनेते हारुणभाई इनामदार
केज-
केज नगरपंचायत चे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) गटनेते हारुणभाई इनामदार यांनी आज केज येथील विश्रामगृहावर पत्रकार परिषद आयोजित केली होती . सदरील पञकार परिषदेला गटनेते हरूनभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ.सिताताई बनसोड, नगरसेविका पदमीनबाई शिंदे ,राजू इनामदार ,जलालभाई इनामदार व पञकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पत्रकार परिषदेत त्यांनी केज शहरातील मोक्याची जिरायत खात्याची जागा केज नगरपंचायतला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शिफारशीनुसार हस्तांतरित झाली असल्याची माहिती दिली .
केज शहरातील व्यापाऱ्यांना यामुळे व्यापारी संकुलाच्या माध्यमातून स्वस्थ दरात नगरपंचायत कडून गाळे व दुकानासाठी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
केज शहरातील नागरिकांची व व्यापारी वर्गांची ही अनेक वर्षापासूनची प्रमुख मागणी होती . यामुळे केज शहरात गटनेते हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांचे व्यापारी वर्गातून जागोजागी स्वागत करण्यात आले.
फलोत्पादन विभागाची जागा केज नगरपंचायतला वर्ग व्हावी म्हणून स्वर्गीय विमलताई मुंदडा, खा.सौ.रजनीताई पाटील, खा.बजरंग बप्पा सोनवणे, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा काकाजी, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर, अंकुश अण्णा इंगळे, सर्व पक्षीय नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, पञकार बांधव व केज शहरातील नागरिकांनी मोलाचे योगदान दिल्याचे गट नेते हरूनभाई इनामदार यांनी नमूद केले. लवकरच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून जागा रिक्वायर करून सदरील जागेवरील अतिक्रमणे हटवून त्या जागी भव्य व्यापारी संकुल उभा केले जाईल असा विश्वास गटनेते हारुणभाई इनामदार यांनी व्यक्त केला.
केज नगरपंचायतला महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे 100 बाय 1000 स्क्वेअर फुट, दहा गुंठे चाळीस आर क्षेत्र जागा क्रीडा संकुलासाठी व इतर कामासाठी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वरील निर्णयामुळे केजच्या विकासात मोलाची भर पडणार आहे हे निश्चित.