Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपत्ती ग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत करणार- रमेशराव आडसकर केज-

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 28, 2025No Comments2 Mins Read

वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आपत्ती ग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत करणार-
रमेशराव आडसकर

केज-
केज शहरातील वसंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी व्यासपीठावर मा. रमेशराव आडसकर, रणजीतभैया आडसकर, प्राचार्य श्री. फावडे, चेअरमन श्री. सुरेश शिनगारे, सचिव श्री. बालासाहेब घुगे व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभेची सुरुवात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली व सरस्वती पूजनाने झाली. संस्थेचे प्रेरणास्थान बाबुरावजी आडसकर यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. सध्याच्या अवर्षण व निसर्ग संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाहुणे मा. रमेशराव आडसकर यांच्या सूचनेनुसार कोणताही औपचारिक स्वागत सोहळा न घेता कार्यक्रम साधेपणाने पार पडला.
आपल्या मार्गदर्शनात मा. आडसकर साहेब म्हणाले की, “शेतकरी संकटात आहे. अशा वेळेस आपण सर्वांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी पतसंस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना भरीव मदतीचे आश्वासन दिले.
या वेळी एमबीबीएस व आयआयटीमध्ये निवड झालेल्या सभासदांच्या पाल्यांचा, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेने अल्पावधीत केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत सभासदांनी जास्तीत जास्त ठेवी पतसंस्थेत ठेवाव्यात, असे आवाहन केले.
पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुरेश शिनगारे यांनी आपल्या आर्थिक अहवालात सांगितले की चालू वर्षात संस्थेला ९१ लाख रुपयांचा नफा झाला असून, सर्व सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाळ्यांच्या गजरात ही घोषणा स्वागतार्ह ठरली.
माजी चेअरमन श्री. शाहूराव साखरे यांनीही आपले विचार मांडत संस्थेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सचिव श्री. बालासाहेब घुगे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

विजयराज आरकडे

Post Views: 132
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.