अर्चना कुटे यांना सीआयडी पथकाकडून केज न्यायालयात केले हजर;
महागडी दुचाकी केज पोलिसांनी केली जप्त
गौतम बचुटे/केज :- ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी सी आय डी ने पुणे येथे ताब्यात घेतलेल्या अर्चना कुटे यांना आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी पहाटे ४:०० वाजता पुणे येथून केज येथे आणण्यात आले. त्यांना १२:३० वाजता केज येथील न्यायालयात हजर करण्यासाठी सीआयडी पथकाने घेऊन गेले आहेत. त्यांच्यावर केज आणि नांदुरघाट येथील ठेवीदारांचे ठेवी बुडविल्याचा आरोप आहे.
१७ लाखाची दुचाकी जप्त
———————————
:- तीन दिवसा पूर्वी सीआयडी च्या पथकाने त्या वापरीत असलेली बी एम डब्ल्यू कंपनीची सुमारे १७ लाख रु. किमतीची त्यांची एक दुचाकी केज पोलिस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहे.
