गंगा माऊली शुगरचा चौथा हंगाम बॉयलर अग्नी प्रज्वलन
(यावर्षी कारखाना विक्रमी गाळप करणार)
केज-
केज तालुक्यासह बीड व धाराशिव जिल्हयात गंगा माऊली शुगर ने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून अल्पावधीत शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या गंगा माऊली शुगरचे चौथे बॉयलर अग्निपदन गोटेगाव चे सरपंच तथा गंगा माऊली शुगरचे कौटुंबिक स्नेही शहाजी पवार व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते व हभप किसन महाराज पवार, हभप उद्धव बापू आपेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
गंगा माऊली शुगरने जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर देखील आपली वेगळी ओळख उसाच्या गळीत हंगामातून तयार केली असून गेल्या गळीत हंगामात कारखान्याने केवळ साखर निर्मिती असताना देखील सर्वाबरोबर 2700 रु भाव दिला व प्रत्येक पंधरवाड्याला हे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले असून यामुळे शेतकऱ्यांना या कारखान्यावर विश्वासहर्ता निर्माण झाली आहे.
येणाऱ्या हंगामात कारखाना चांगल्या पद्धतीने गाळप करेल असा विश्वास यावेळी बोलताना कारखान्याचे संचालक आदित्य पाटील व राहुल सोनवणे यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन हनुमंत मोरे, विखे पाटील कारखानाचे चेअरमन नवनाथ थोटे, बाबाराजे देशमुख, प्रवीणकुमार शेप, गणेश राऊत, बाळासाहेब ठोंबरे यांचेसह सर्व संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. मुजावर, शेतकी अधिकारी अविनाश आदनाक व सर्व विभाग प्रमुख, व शेतकरी आदींची उपस्थिती होती.
