Author: विजयराज आरकडे

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून खा.रजनीताई पाटील यांचा देशाच्या स्टार प्रचारक यादीत समावेश बीड (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कॉग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातून एकमेव खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसने रजनीताई पाटील यांची स्टार प्रचार म्हणून निवड केल्याने पाटील यांची गांधी घराण्याशी असलेली एकनिष्ठता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर कॉग्रेसने आता आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्र आिण जम्मू काश्मिर निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. सत्ताधारी भाजपविरुध्द काँग्रेसने आता कंबर कसली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक…

Read More

अ.भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या केज तालुका उपाध्यक्षपदी सखुबाई चौरे यांची निवड केज अ. भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या केज तालुका उपाध्यक्षपदी सखुबाई चौरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उद्देशाप्रमाणे पोलीस दलातील महीला व पुरुष कर्मचारी यांच्या समस्या सोडवून सामाजिक कार्य करण्यासाठी ही निवड केली आहे. अ. भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे मराठावाडा अध्यक्ष बालाजी एस. मुळे, मराठवाडा संघटक आर. एस. जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे. महीला समुपदेशन केंद्राच्या खाडे मॅडम व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महीलांनी या निवडीचे स्वागत केले आहे.

Read More

*मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी- दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती* *२ सप्टेंबर रोजी दलित समाजाच्या वतीने केज शहरात होणार तिव्र निदर्शने* केज/प्रतिनिधी मिलिंद एकबोटे यांना केज शहरात येण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे दलित अन्याय अत्याचार निर्मूलन समिती केज च्या पदाधिकाऱ्याने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी केज येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये भीमा कोरेगाव हल्ल्यातील मुख्य आरोपी असणारी व्यक्ती मिलिंद एकबोटे ही असून हि व्यक्ती केज शहरात येणार आहे.तरी आंबेडकरी समाजाच्या वतीने केज शहरात…

Read More

बायकोचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून महिलेचा खून ! आरोपी नवरा पोलिसांच्या ताब्यात गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील शेतात एका महिलेचा चारित्र्याच्या संशया वरून खून झाला असून हा खून तिच्या नवऱ्यानेच केला आहे. खून करून तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील नागझरी येथील सुवर्णा आणि विलास आघाव हे पती-पत्नी हे सारणी (आनंदगाव) येथे सालगडी म्हणून एका शेतात काम करीत होते. दि. ३१ ऑगस्ट रोजी आंनदगाव (सारणी) ता. केज येथील शेतात आज दुपारी विलास नामदेव आघाव रा. नागझरी ता. धारूर या सालगड्याने त्याची पत्नीचे एका पुरूषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या चारित्र्याच्या…

Read More

अंगणात मूग बडीवीत असलेल्या महिलेच्या अंगावर विज पडून मृत्यू गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील कोरेगाव येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान अंगावर विज पडून तापशीला बाळासाहेब दराडे वय ४० वर्ष या महिलेचा मृत्यू झाला आहे. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथे घरा समोर अंगणात मुग बडवीत असलेल्या महिला तापशिला बाळासाहेब दराडे वय (४० वर्षे) हिच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.

Read More

कर्तव्यदक्ष व तडफदार अधिकारी म्हणून ओळखले जाणारे राकेश गिड्डे केजचे नवीन तहसीलदार म्हणून नियुक्त केज : येथील तहसीलदारांचे पद रिक्त होते. यामुळे येथे तहसीलदार म्हणून कोण येणार? याकडे लक्ष लागले होते. आज महाराष्ट्र शासनाने तहसीलदार यांच्या बदलीचे आदेश काढले असून यात राकेश आण्णासाहेब गिड्डे यांची केज तहसीलदारपदी नियुक्ती केली असून ते येत्या काही दिवसांत पदभार घेतील . तडफदार अधिकारी अशी त्यांची कारकिर्द आहे. तहसीलदार आले आता गटविकास अधिकारी कधी येणार याची केज तालुक्याला प्रतीक्षा आहे. जवळपास तीन महिन्यांपूर्वी एसीबीने कारवाई करत कोतवालास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतर तहसीलदार गायब असल्याने येथील पद रिक्त होते. ते प्रभारी अधिकारी कामकाज…

Read More

*आरोग्य विभागातील भर्ती संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन* गौतम बचुटे/केज (बीड) :- बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेविका पदासाठी जी एन एम आणि बी एस्सी नर्सिंग यांची निवड करून त्यांनाही संधी देण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत सरळ सेवेने आरोग्यसेविका पदाच्या भरती संदर्भात झालेल्या लेखी परीक्षे नंतर त्यांची गुणवत्ता यादी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाल्या नंतर दि. २८ ऑगस्ट पासून त्यांच्या कागद पत्रांची पडताळणी ही जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत सुरू आहे मात्र ज्या विद्यार्थिनींनी जी एन एम आणि बी एस सी…

Read More

जी आमदार संगिता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला संगीता ठोंबरे यांच्यासह चालक जखमी केज – केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या गाडीवर एका व्यक्तीने दगड मारून हल्ला केला आहे. यात गाडीचा काच फुटून समोर बसलेल्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांच्या चेहर्याला मार लागला आहे तसेच वाहन चालकही जखमी झाला आहे. ही घटना तालुक्यातील दहीफळ येथे घडली असून संगीताताई ठोंबरे या उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाल्या आहेत. नेमका हा प्रकार कशा मुळे घडला व त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही.

Read More

वसंत प्राथमिक शाळेत बाल गोपाळांनी केला दहीहंडी उत्सव आनंदाने साजरा केज- येथील वसंत प्राथमिक शाळा केज येथील बालगोपाळांनी गोपालकाला निमित्ताने दहीहंडी उत्सव उत्साहाने साजरा करून आनंद घेतला. शहरातील मराठी-सेमी माध्यमातील एक नामांकित शिक्षण देणारी शाळा म्हणून वसंत प्राथमिक शाळेची ओळख आहे. गोपालकाला निमित्ताने आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात शाळेतील बालगोपाळांनी राधा कृष्ण वेशभूषा परिधान करून व विविध नृत्य सादरीकरण करून आनंद साजरा केला. यानंतर सर्व विद्यार्थी यांच्या एकजुटीने दहीहंडी फोडून उत्सव उत्साहाने साजरा केला गेला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, किरण अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून हा उत्सव उत्साहाने साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली.…

Read More

डॉ अंजलीताई घाडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश येणार्या काळात केज मतदारसंघात योग्य संधी देऊन न्याय देण्याचे मा. जयंत पाटील यांनी केले मोठे विधान केज- केज मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्या डॉ अंजलीताई घाडगे यांनी रा. कॉ. शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एका आयोजित मेळाव्यात पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी मा. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अंजलीताई घाडगे यांची माहिती उपस्थित नेते, कार्यकर्ते यांना देताना सांगितले की, डॉ अंजलीताई घाडगे या उच्च शिक्षित असून त्यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले कार्य आहे. शिव स्वराज्य यात्रा केज मतदारसंघात पोहचल्यानंतर त्यांनी व त्यांच्या संबधित कार्यकर्ते यांनी खूप छान पध्दतीने…

Read More