अंगणात मूग बडीवीत असलेल्या महिलेच्या अंगावर विज पडून मृत्यू
गौतम बचुटे/केज (बीड) :- केज तालुक्यातील कोरेगाव येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान अंगावर विज पडून तापशीला बाळासाहेब दराडे वय ४० वर्ष या महिलेचा मृत्यू झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील कोरेगाव येथे घरा समोर अंगणात मुग बडवीत असलेल्या महिला तापशिला बाळासाहेब दराडे वय (४० वर्षे) हिच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.