डॉ अंजलीताई घाडगे यांचा केज मतदारसंघात वाढता जनसंपर्क
प्रतिभावंत उमेदवार म्हणून पसंती मिळत असल्याचे चित्र
केज-
आगामी विधानसभा केज मतदारसंघातून डॉ अंजलीताई घाडगे यांनी शरदचंद्रजी पवार रा. कॉ. यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असून. त्यांच्या संपर्क दौर्याला वाढता जनसंपर्क मिळत असून प्रतिभावंत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे केज मतदारसंघातील मतदार पाहत आहेत.
डॉ अंजलीताई घाडगे यांनी विधानसभा २०१४ ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी चांगले मतदान घेऊन चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्या सातत्याने मतदारसंघातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन काम करत राहिले आहेत.
यावेळी त्यांना मतदारसंघातील सर्व समाजातील नागरिक महीला, पुरुष यांच्याकडून भरभरून
प्रतिसाद मिळत आहे.
