अ.भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या केज तालुका उपाध्यक्षपदी सखुबाई चौरे यांची निवड
केज
अ. भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या केज तालुका उपाध्यक्षपदी सखुबाई चौरे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या उद्देशाप्रमाणे पोलीस दलातील महीला व पुरुष कर्मचारी यांच्या समस्या सोडवून सामाजिक कार्य करण्यासाठी ही निवड केली आहे.
अ. भा.पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे मराठावाडा अध्यक्ष बालाजी एस. मुळे, मराठवाडा संघटक आर. एस. जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली आहे.
महीला समुपदेशन केंद्राच्या खाडे मॅडम व इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महीलांनी या निवडीचे स्वागत केले आहे.
