Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

केज रोटरी शिक्षकांसाठीचे “नेशन बिल्डर अवॉर्डस” जाहीर

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 4, 2024No Comments2 Mins Read

केज रोटरी शिक्षकांसाठीचे “नेशन बिल्डर
अवॉर्डस” जाहीर

केज :
केज रोटरी तर्फे दरवर्षी दिले जाणारे आदर्श शिक्षकांसाठीचे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ अर्थात ‘राष्ट्र उभारणी शिल्पकार अवॉर्डस 2024’ जाहीर झाले असून केज तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देणाऱ्या दहा शिक्षक-शिक्षिकांना शिक्षकदिनी पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ केज चे विद्यमान अध्यक्ष रो प्रकाश कामाजी, सचिव रो अनंत तरकसबंद, प्रोजेक्ट चेअरमन हनुमंत भोसले, श्रीराम देशमुख, प्रा डॉ बीजे हिरवे यांनी दिली आहे.
शिक्षण क्षेत्र हे समाजाचे महत्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात प्रत्येक शिक्षकांचे कार्य महत्वाचे असले तरी जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण सेवा देणाऱ्या शिक्षकांचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. कारण येथेच मुलांच्या मूलभूत शिक्षणाचा पाया भक्कम बनतो. म्हणून या शिक्षकांच्या सेवेचे अधिक महत्व वाटते. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण क्षेत्रात अनेक शिक्षक अत्यंत निष्ठेने व आवडीने आपली सेवा पार पाडतात. प्रत्यक्ष त्यांचे कार्य जाणून घेतल्यास समाजाला अभिमान वाटावा असे त्यांचे कार्य असून अशा शिक्षकांच्या पाठीवर समाजातून शाबासकीची थाप पडणे आवश्यक आहे. अनेक वेळा अशा चांगल्या कार्य करणाऱ्या शिक्षकांची समाज व शासन योग्य ती दखल घेत नाही. लोकप्रतिनिधी अनेकवेळा शासकीय पुरस्कारासाठी आपल्या मर्जीतील व हितसंबंधांतील लोकांचीच नावे अधिकतर शासकीय पुरस्कारासाठी शिफारस करतात अशा वेळी खरे कर्तव्यदक्ष व सेवेशी निष्ठावान असलेले शिक्षक सन्मानापासून दुर्लक्षित राहतात. तरीही त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच असते. केज तालुक्यातील अशा लोकांची दखल घेण्याचे केज रोटरीने ठरवले आहे.
‘रोटरी इंटरनॅशनल’ ही एक जगातील सर्वात मोठी ‘जागतिक सामाजिक संस्था’ असून या संस्थेच्या पुरस्काराची सामाजिक व प्रशासकीय पातळीवर खूप मोठी प्रतिष्ठा आहे. या संस्थेचे पुरस्कारही योग्य व पात्र अशा व्यक्तीलाच दिले जातात.
वर्ष 2024 साठी केज तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण सेवेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक सेवा देणाऱ्या दहा शिक्षकांसाठीचे “नेशन बिल्डर अवॉर्ड” अर्थात ” राष्ट्र उभारणी शिल्पकार” पुरस्कार घोषित केले असून या पुरस्काराचे मानकरी 1. संदेश अंबादास फावडे 2. अशोक अनंतराव जोगदंड 3. मुल्ला समद बशीर साब 4. अनंत नानाभाऊ जाधवर 5. श्रीकृष्ण लक्ष्मणराव सिरसट 6. प्रशांत लक्ष्मणराव जाधव 7. गीता जीवराज अंडिल 8. वैशाली शंकरराव धाडवे 9. वैशाली कारभारी बोराडे 10. स्वाती वामनराव समुद्रे हे आहेत. या पुरस्काराची निवड समितीने केज तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेऊन केली असून हे पुरस्कार दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नवीन शिक्षकांना देण्यात येणार आहेत. निवड प्रक्रियेत हनुमंत भोसले, प्रवीण देशपांडे, दादा जमाले, अरुण अंजाण, श्रीराम देशमुख व प्रा डॉ बीजे हिरवे या सदस्यांनी सहकार्य केले. या पुरस्कारांचे वितरण मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनाचे औचित्य बाळगून 17 सप्टेंबर 24 रोजी सायंकाळी करण्यात येणार असल्याची माहिती केज रोटरीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कामाजी, सचिव अनंत तरकसबंद यांनी दिली आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 52
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.