कानडी रोड सिमेंट रस्त्याचे काम नियमाप्रमाणे करावे अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा; केज- कानडी रस्ता 33 फुटांचा आहे. शाहिद रामदास गायकवाड चौक ते मेन रोड सिमेंट रस्त्याचे काम 20 ते 25 फूट रुंदीचेच चालू आहे. काही राजकीय पुढाऱ्यांकडून सांगण्यावरून हे काम सुरू आहे. कानडी रोड वरील अतिक्रमण काढून रस्ता हा 33 फुटाप्रमाणे करण्यात यावा ही अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा अविनाश काळे, प्रेम गायकवाड, लक्ष्मण जाधव. रवी डुकरे,संदीप भुतडा व इतर नागरिक यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
Author: विजयराज आरकडे
परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूजा पवार यांची धाडसी कारवाई गौतम बचुटे/केज :- परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक पूजा पवार यांनी केज तालुक्यातील सुर्डी येथे धाडसी कारवाई करून शेतातील जनावरांना चारा म्हणून वापरण्यात येणाऱ्या घासाच्या पिकात शेतकऱ्यांनी जोपासलेला ३ लाख ९४ हजार रु. किमतीचा गांजा जप्त केला होता. त्यातील आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या बाबतची माहिती अशी की, दि. २३ जून रोजी सहाय्यक जिल्हा पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की, माळेगांव ता. केज येथील शिवारात सिद्धेश्वर तुकाराम ठोंबरे (रा. सुर्डी ता. केज) यांनी त्यांच्या मालकीच्या शेत सर्व्हे नंबर ८४ मधील शेतातील जनावरांना चाऱ्यासाठी वापरल्या जात…
सरपंच रुख्मांगद खेत्रे यांच्यावरील गुन्हा मागे घ्यावा – केज तालुका सरपंच परिषदेची मागणी केज — दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले असून सदरील रक्कम ही सरपंच यांनी सदरील रक्कम ही स्वतःसाठी घेतली नाही तर विहीर मंजुरीसाठी जे अधिकारी पैसे मागतात त्यांना देण्यासाठी घेतली होती यात त्यांचा काहीही दोष नसल्याने त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करावे अशी मागणी केज तालुका सरपंच परिषदेच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर वृतांत असा की दोन दिवसापूर्वी माजलगाव तालुक्यातील कीट्टी आडगाव चे सरपंच रुख्मांगद खेत्रे यांनी विहीर मंजुरीसाठी लाभार्थी यांचेकडून पैसे घेतल्याचे…
लिओ लेडीज़ जिमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा केज- केज मधील एकमेव लेडीज़ साठी प्रसिद्ध असलेली लिओ लेडीज़ जिमचा प्रथम वर्धापन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. मा.सीताताई बनसोड मॅडम नगराधक्षा केज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिमच्या संचालिका सौ.स्नेहल विजय एखंडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचन केले. तसेच डॉ.दिपाली बुदगुडे मॅडम यांनी महिलांना व्यायाम व आहार याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सौ.मोनिका गिरी मॅडम, सौ.मनीषा ढोकर, सौ.सुषमा कलेकर यांनी आपले गेल्या वर्षभरात जिम मध्ये आलेल्या अनुभवांबद्दल मत व्यक्त केले. त्यानंतर जिमचे ओनर श्री.विजय एखंडे सर यांनी जिम वर्कआउट का करायला पाहिजे तसेच आपला आहार कसा सकस असायला पाहिजे याबद्दल…
सौ.भावना कुलकर्णी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम माजलगाव:- दि.1जून 2025 रोजी इरा रांगोळी “कलागुरू” मंडळा मार्फत,पुणे येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून रांगोळी कलाकार या स्पर्धेसाठी आले होते. या स्पर्धेत सौ.भावना अनिल कुलकर्णी (नागडगावकर) यांचा बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आला आहे. शिवाजी नगर माजलगाव याठिकाणी राहणाऱ्या, सौ.भावना या जि.प.शिक्षक अनिल कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमेश आडसकर यांचा वाढदिवस इन्फंट इंडियाच्या बालका सोबत साजरा गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रमेश आडसकर यांचा वाढदिवस दत्ताभाऊ बारगजे आणि सौ. संध्याताई बारगजे यांच्या पाली येथील आनंदग्राम मधील बालका सोबत साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्याचे नेते रमेशराव आडसकर यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे कट्टर समर्थक आणि साळेगाव येथील सरपंच कैलास जाधव पाटील यांनी बीड जवळील पाली येथे सौ. संध्याताई बारगजे आणि दत्ताभाऊ बारगजे यांच्या अनाथ आश्रमातील बालका सोबत भोजन करून आणि त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी आणि हितगुज साधले. यावेळी दत्ताभाऊ बारगजे यांनी त्यांच्याशी आश्रम उभारणी पासून ते येथील बालकांच्या…
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रा.कॉ. पक्षाचे सभासद व्हा– रमेशराव आडसकर —————————- उजणी येथून दोन टियमसी पाणी मांजरा धरणात आणून कॅनॉल द्वारे केज तालुक्यातील संपूर्ण गावांमध्ये पोहचवून शेतकरी बांधवांची शेती वलीताखाली आणने, गाव तिथे सिमेंट बंधारे, प्रत्येक गावाला एक कोटीचा निधी, नवीन जल योजना व रस्ते, वीजपुरवठा, घरकुल योजना, सेंटर फॉर अॅण्ड ईन्कोभबीशन धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात योजना राबविणे, व कार्यकर्ता आर्थिक सक्षम व्हावा यासाठी विशेष प्राधान्य देणार —– रमेशराव आडसकर केज- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक, महीली, युवा कार्यकर्ते यांनी सभासद नोंदणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रा. कॉ. पक्षाचे अधिकृत…
जिद्द व अभ्यासाच्या जोरावर शाहीदने मिळवले ९९.२०% सर्वत्र होत आहे कौतुक केज- एस. एस. सी. दहीवी बोर्ड परिक्षेत शाहेद सय्यद निशाद हरणमारे याने अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या जोरावर ९९.२०% प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे. वडीलाचे छत्र हरवलेले नंतर आई नेकनूर येथील मुखबधीर निवासी शाळेत स्वंयपाकी म्हणून काम करत आहेत. परंतु त्यांनी आपले मुले शिक्षणात घडावेत यासाठी सतत धडपड करीत त्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निशाद या केज येथे आपली आई, मुलगा शाहीद व मुलीसोबत रहात आहेत. आईच्या मेहनतीची जाण ठेवून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाहीदने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे शाहीद व त्यांच्या कुटुंबाचे शिक्षण क्षेत्रातून सर्वत्र…
केज शहरात भरधाव कंटेनेरने अनेकांना अनेकांना धडकीवले; एक महिला जागीच ठार तर अनेक जण गंभीर जखमी केज- आज दि. १६ रोजी तिन च्या सुमारास मांजरसुंबा मार्गी आलेले एका कंटेनेरने शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक पायी चालणारे नागरिक व वाहनांना धडीकी देत पुढे जात असल्याचे दिसून आले. यात मिना घोडके या महीलेचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक वाहनाचे नुकसान झाले आहे. पुढे चंदनसावर, लोखंडी येथेही अनेक वाहन, नागरिक, यांना या कंटेनेरने धडकी दिल्या आहेत. यानंतर हा कंटेनर लोखंडी सावरगाव जवळ उलटला असल्याचे समजत आहे. जखमींना रूग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस प्रशासन रुग्णवाहिका व नागरीकांनी तातडीने हालचाली केल्या…
आडसकर चषकाचे आज होणार भव्य उद्घाटन; अनेक राजकीय मान्यवर, दिग्गज खेळाडुंची राहणार उपस्थिती; केज- यावर्षीपासून आडसकर चषकाचे डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केज येथे पंचायत समिती मैदानावर दि. ९ ता. पासून करण्यात आले आहे. आज सांयकाळी आ. विजयसिंहराजे पंडित गेवराई विधानसभा, आ. नमिताताई मुंदडा यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी केज व माजलगाव, अंबाजोगाई, धारूर येथील राजकीय, प्रशासकीय, खेळाडू यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित संघ व खेळाडू सहभागी झाले आहेत. मराठवाड्याचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे पाहण्यात येत आहे. या स्पर्धेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बहुसंख्य क्रिकेट प्रेमी, खेळाडू यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक, आयोजक…