Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा खाजगीकरणा विरोधात देशव्यापी संप

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 8, 2025No Comments2 Mins Read

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा खाजगीकरणा विरोधात देशव्यापी संप

केज- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या संलग्न स्वतंत्र मजदूर युनीयन वतीने बुधवारी दि.09 जुलै रोजी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जे कंपन्यांचे खाजगीकरण चालू आहे त्या विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात केज तालुका महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांनी, सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तसेच सक्रिय कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले यांनी केले आहे. सदरील संप विद्युत विभागातील सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात आहे .हा संप बहुजनांचे संविधानिक हक्क कायम ठेवण्यासाठी होत आहे ,हा संप सरकार संविधान विरोधी कायदा आणत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी होत आहे, तसेच वीज ग्राहकांच्या हितास्तव होत आहे ,येणाऱ्या पिढ्यांच्या शासकीय नोकऱ्या अस्तित्वात राहाव्यात म्हणून होत आहे, शासकीय वीज कंपन्यांचे अस्तित्व अबाधित राहावे म्हणून होत आहे. तसेच इतर प्रमुख मागण्या देखील करण्यात आल्या आहेत कर्मचारी भरती तीन वर्षाकरिता कंत्राटी पद्धतीने न भरता स्थायी स्वरूपात करण्यात येईल , तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गासह आरक्षित प्रवर्गातून पदोन्नतीमध्ये आरक्षण त्वरित लागू करावी अशी मागणी यामध्ये लावून धरण्यात येणार आहे. 09 जुलै 2025 रोजी बुधवारचा देशव्यापी संप शंभर टक्के यशस्वी करावा असे आवाहन संजय मोरे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 130
विजयराज आरकडे

Related Posts

जीवन विकास शिक्षण मंडळ केज आयोजित स्व. केशवराव नाळवंडीकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न;

September 6, 2026

उमेद अभियानाच्या केज तालुका ग्रामसखींचे विविध मागण्यांसाठी निवेदन मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

September 5, 2026

अखेर कानडी रोडवरील पूल वाहतुकीसाठी खुला; स्थानिक युवकांच्या पुढाकाराने अवघ्या दोन दिवसांत दर्जेदार काम पूर्ण

September 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 7 4
Total Users : 149374
Views Today : 2

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.