Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

जि. प. सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेJuly 4, 2025No Comments2 Mins Read

जि. प. सोनीजवळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्व्हर मेडल

केज-

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनिजवळा, शाळेतील इ .इयत्ता दुसरी ते सहावीच्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी एमटीएस ओलंपियाड -2025 या राज्यस्तरीय परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभाग घेतला होता . यापैकी पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल तर पाच विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवून उत्तुंग यश प्राप्त केले आहे . तसेच उर्वरित पंधरा विद्यार्थीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत . या पदकविजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज शाळेत आयोजित करण्यात आला होता .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . हनुमंत गायकवाड आणि प्रमुख अतिथी म्हणून समितीचे उपाध्यक्ष श्री .प्रवीण मस्के तसेच पीएसआय कु .स्वरूपा नाईकवाडे , दैनिक सामनाचे पत्रकार श्री . सुंदरराव नाईकवाडे यांनी स्थान भूषविले . कार्यक्रमास सर्व शिक्षक , विद्यार्थी ,गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यानंतर मुख्याध्यापक श्री . गुंड सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले . अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाच गोल्ड मेडल आणि पाच सिल्वर मेडल सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले . तसेच परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र वितरत करण्यात आले . विशेष म्हणजे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचाही शाल आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमात पीएसआय कु .स्वरूपा नाईकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि चॉकलेट भेट स्वरूपात दिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री . सावंत सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीम. पवार मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीम .नवले मॅडम, गिरी मॅडम , श्री .काळे सर, सांगळे सर ,दौंड सर आणि जावळे सर , यांनी परिश्रम घेतले .
विद्यार्थ्यांच्या या यशाचे सरपंच सौ. जान्हवीताई गोविंद ससाने, उपसरपंच स्वातीताई दादासाहेब कोकाटे , व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि पत्रकार श्री . दशरथ चौरे यांनी कौतुक केले आहे .

विजयराज आरकडे

Post Views: 190
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 4 5
Total Users : 146045
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.