Author: विजयराज आरकडे

रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ! केज- केज तालुका रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या वतीने मुस्लिमधर्मीय बांधव यांच्या पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले आणि युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी मुस्लिम धर्मीय बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील रोजाच्या उपवासा निमित्त दि. २९ मार्च रोजी लव्हुरी येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. त्याच सोबत लव्हुरी येथे उभारलेल्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन…

Read More

अपहरण करून २५ लाख रु. खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या केज पोलिसांनी आवळल्या मुसक्या ! खंडणीखोर गुन्हेगार केज येथे एका तृतीयपंथी सोबत राहात होता ! गौतम बचुटे/केज :- जालना जिल्ह्यातील एका वीटभट्टी मालकाचे २५ लाख रु. च्या खंडणीसाठी अपहरण करून खंडणी न दिल्यास कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिलेल्या अपहरणकर्त्या पैकी एका गुन्हेगाराला केज पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या बाबतची माहिती अशी की, दि. २९ मार्च रोजी केज येथील फुले नगर येथून ताब्यात घेतलेला आरोपी आकाश घुगे आणि त्याचे साथीदार यांनी दिनांक २२ मार्च रोजी रात्री ३:३० वा. च्या सुमारास जालना जिल्ह्यातील धानोरा येथील वीटभट्टी मालक निवृत्ती रामभाऊ तांगडे…

Read More

शाहीर तुकाराम सुवर्णकार यांना युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार केज – तालुक्यातील बनसारोळा येथील भूमिपुत्र शाहीर तुकाराम सूर्यकांत सुवर्णकार यांना अखिल भारतीय सोनार समाज प्रतिष्ठान ,अंबाजोगाई यांच्या कडून दिला जाणारा मानाचा पुरस्कार २०२५ चा युवा समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तुकाराम सुवर्णकार महाराज हे परिसरात अनेक वर्षापासून शाहीर म्हणून परिचित आहेत गायन ,जनजागृती कलाक्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना युवा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेश भाऊ पंडित, निवड समितीचे राजेंद्र पारखे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Read More

वसंत प्रा. शाळेचा विद्यार्थी अवधूत राऊत याचे एम.टी.एस.परिक्षेत घवघवीत यश केज- शहरातील वसंत प्राथमिक शाळा केज येथील इयत्ता पहीलीत शिकणारा विद्यार्थी अवधूत गोविंद राऊत यांने एम. टी. एस. या स्पर्धा परिक्षेत गोल्ड मेडल पटकावले आहे. त्याने पहिल्याच स्पर्धा परिक्षेत 150/126 गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत देशमुख, अस्वले सर, प्रविण देशमुख सर, विजय आरकडे सर, बालवाडी शिक्षिका, हजारे मॅडम, बनसोडे मॅडम यांनी अवधूत राऊत याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पालक वर्गातूनही अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More

एम.टी.एस. परीक्षेत कु. प्रीशा रोकडे राज्यात द्वितीय केज – तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवासी रामहरी धोंडीराम रोकडे यांची नात कु. प्रीशा महेश रोकडे हिने एम. टी. एस. या स्पर्धा परीक्षेत राज्यातून दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. कु. प्रीशा महेश रोकडे हि अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन प्राथमिक विद्यालयाची वर्ग दुसरीची विद्यार्थिनी‌ आहे . एम.टी.एस.परीक्षेत राज्यातून दुसरी आलेली प्रीशा महेश रोकडे हिने 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. कु.प्रीशा रोकडे ही महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील आदर्श शिक्षक महेश रामहरी रोकडे यांची मुलगी आहे. तिला आई वर्षा रोकडे, वडील महेश रोकडे, आजोबा रामहरी रोकडे आणि योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षकांचे…

Read More

३६ वर्षे सेवा करून विष्णू घोडके सेवानिवृत्त…..! केज – ३६ वर्षे शिक्षक म्हणून अविरत सेवा बजावलेले विष्णू मुरलीधर घोडके हे नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले. चिंचोलीमाळी जि. प. केंद्रीय शाळेत केंद्रातील मुख्याद्यापक व शिक्षकांच्या वतीने निरोप देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी सुनील केंद्रे, दत्तात्रय चाटे, केंद्रीय मुख्याद्यापक अंकुश सारूक, सरपंच कमल गोरख भांगे, पत्रकार डी. डी. बनसोडे, सक्रिय पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गालफाडे, राम मेजर राऊत, चेअरमन अरुण काळे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुधाकर ढाकणे, आर.पी.राऊत, सरपंच अशोक राऊत, डॉ. नेहा जगताप, सेवानिवृत्त अभियंता एस.एम.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी…

Read More

केज पोलीस ठाण्या समोर ऊसतोड मजुराचा आत्मदहनाचा प्रयत्न गौतम बचुटे/केज :- ऊस तोडणीसाठी मजूर देतो असे सांगून ऊसतोड मजूर असलेल्या ट्रॅक्टर मालकाची फसवणूक केल्याने संतप्त ऊसतोड मजुराने केज पोलीस ठाण्या समोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच अत्यंत चपळाईने पोलीसांनी आत्मदहन करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला येथील पुष्पा मोहन ढाकणे आणि त्यांचे पती मोहन ढाकणे यांच्याकडे ट्रॅक्टर असून ते साखर कारखान्यावर ऊसतोडणी करून कुटुंबाची उपजीविका करीत आहेत. त्यांना दीड कोयते म्हणजे तीन ऊसतोड मजूर देतो असे सांगून बाजीराव ढाकणे रा. जोला ता. केज याने पुष्पा व मोहन…

Read More

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाची कु. धनश्री धनराज म्हेत्रेची नवोदय विद्यालया साठी निवड

Read More

केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ————————————————– गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११४ सरपंच पदाची सोडत केज येथील तहसील कार्यालयात २५ मार्च रोजी काढण्यात आली. केज तालुक्यात सन २०२० ते २०२५ दरम्यान होणाऱ्या ग्रामपंचतीच्या निवडणुकातील सरपंच पदांच्या आरक्षणनाची सोडत दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:०० वा केज तहसिल कार्यालयात तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या आदेशा नुसार काढण्यात आली. या वेळी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्यासह नायब तहसीलदार भंडारे, आशा गायकवाड-वाघ, रामटेके, नन्नवरे हे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी SC- १८ ग्राम पंचायती आरक्षित :- अनुसुचित जातींच्या महिलांसाठी सादोळा, बोरीसावरगाव, मोटेगाव, इस्थळ, लाखा,…

Read More

आत्मनिर्भर भारतासाठी जल व्यवस्थापन काळाची गरज – डॉ‌.हनुमंत सौदागर केज – वर्तमान काळात पाणी, नाणी आणि वाणी याचा अत्यंत जपून वापर करणे आवश्यक आहे. कारण या तिन्हीच्याही अतिरिक्त वापरामुळे अनेक समस्या गंभीर निर्माण झाल्या असून भारताला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जल व्यवस्थापन करणे ही काळाची गरज व भविष्याची मागणी असण्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले. ते सरस्वती महाविद्यालय व भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालय, केज यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल विभागाच्या वतीने आयोजित 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किरणकुमार धिंमधिमे हे होते. यावेळी प्रा. राजश्री कचरे व प्रा. उषा बलाढ्ये…

Read More