इंजि. मंगेश वंजारे यांनी पहील्या पगारातून बेघर नागरिकांना दिले अन्नदान
बीड-
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जळगाव येथे काही महिन्यांपूर्वी रूजू झालेले इंजिनियर मंगेश वंजारे यांनी आपला पहिला मासिक पगार झाल्याबद्दल आपले दिवंगत आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ बेघर जिव्हाळा केंद्र बीड, संस्थापक राजू वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील बेघर नागरिकांना अन्नदान करण्यात आले आहे.
इंजि. मंगेश वंजारे हे येळंब ता. जि. बीड येथील रहिवासी आहेत. ते सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मिठू वंजारे यांचे चिरंजीव आहेत तर सेवानिवृत्त उपप्राचार्य मिलिंद वंजारे यांचे पुतणे आहेत.
वंजारे परिवाराकडून राबविण्यात आलेल्या या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
तसेच बेघर निवारा केंद्रातील कर्मचारी छायाताई यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार मिळाला आहे त्यांचाही वंजारे परिवाराकडून सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब शेंडगे (चौसाळा), संग्राम आरकडे, धन्वे सर, आशाबाई शिंदे, साकरबाई आरकडे, प्रा. माया वंजारे, प्रा.राघीनी वंजारे,
प्रा. संगीता वंजारे, प्रभावती आरकडे, दिपाली शेंडगे (ग्रा.प.सदस्य), यश वंजारे,
बेघर जिव्हाळा केंद्र येथील सर्व कर्मचारी, तसेच वंजारे परिवारातील सर्व सदस्य, नातलग महीला, पुरुष यांची विशेष उपस्थिती होती.