Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
Uncategorized

*जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले;* *शेतकर्यासह नागरीक आनंदी*

विजयराज आरकडेBy विजयराज आरकडेSeptember 25, 2024No Comments1 Min Read

*जलवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले;*

*शेतकर्यासह नागरीक आनंदी*

केज-

केज तालुक्यातील मांजरा धरण जवळपास शंभर टक्के भरले असून, आज बुधवारी दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मांजरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील केज, धारुर, अंबाजोगाई शहरांसह लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून, मांजरा धरण आज सकाळी ९६ टक्के भरला. मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने जवळपास दुपारी १२ पर्यंत मांजरा धरण भरलं आहे. यामुळे मांजरा धरण प्रशासनाने आज बुधवारी (दि.२५) दुपारी १२:३० वाजता धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात १७३० क्यूसेक्स (४९.०० क्यूमेक्स )इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. यापूर्वीही नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आजही बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक वाढली तर आणखीही इतर दरवाजे उघडले जाऊ शकतात.

उद्या जलपूजन

दोन वर्षांनंतर मांजरा धरण भरले असून, ही शेतकऱ्यांसह सामान्य माणसासाठी आनंदाचे क्षण आहे. उद्या गुरुवारी (दि.२६) रोजी शेतकर्यांच्या उपस्थित धरणाचे जलपूजन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी सोशलमिडीयावरून कळवले आहे.

विजयराज आरकडे

Post Views: 73
विजयराज आरकडे

Related Posts

कानडी रोड कामातील त्रुटींमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात; नगरोथ्थान योजनेतील कामावर प्रश्नचिन्ह – संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष की ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न? संविधान एकता युवा मंच आंदोलनाच्या पवित्र्यात;

April 23, 2026

संविधान एकता युवा मंच आयोजित निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा संपन्न;

April 10, 2026

*दुख:द घटना* *केजचे कर्तव्य दक्ष, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन*

April 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 6 0 3 7
Total Users : 146037
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.