Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
राजकारण

ईश्वर मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीची फुंकली तुतारी !

By February 29, 2024No Comments2 Mins Read

ईश्वर मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीची फुंकली तुतारी !

गौतम बचुटे/केज :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्रा. ईश्वर मुंडे यांनी मतदार संघातील वाड्या, वस्त्या आणि आठवडी बाजार पिंजून काढायला सुरुवात केली आहे. एक प्रकारे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवून निवडणूक जाहीर होण्या पुर्वीच तुतारी वाजवून रणशिंग फुंकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आणि बीड लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रा. ईश्वर मुंडे हे सज्ज झालेले आहेत. त्यासाठी त्यांनीं लोकसभा मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे त्यांनी परिसरातील गावात लोकांच्या गाठीभेटीवर भर दिलेला आहे. लोकांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा कुटुंबातील सुख दुःख यांच्या सोबत आणि परिसरातील आठवडी बाजारात भेटी देत शेतकरी, शेतमजूर, तरुण आणि वयोवृद्ध यांच्याशी गप्पा टप्पा मारून जेष्ठांचे आशीर्वाद घेत वातावरण निर्माण करून पक्षाचे चिन्ह तुतारी याचाही प्रचार करीत चिन्ह लोकांच्या मनावर बिंबवित आहेत.

दि. २९ फेब्रुवारी गुरुवार रोजी त्यांनी केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात भाजीपाला विक्रेते, व्यापारी, शेतकरी आणि बाजारकरी मंडळी यांच्याशी चर्चा करून लोकांच्या सोबत पालातील हॉटेलमध्ये चहा पाण्याचा आनंद घेतला. तसेच बैल खरेदी-विक्री यांच्या व्यावहाराचीही माहिती घेतली आणि बाजारातील जनावरांच्या बाजारातील तेजी-मंदी याची माहिती घेतली. या वर्षी पाणी टंचाई आणि त्यामुळे होणारी चारा टंचाई व त्याचा पशुधनावर होणार परिणाम या बाबत शेतकरी वर्गाशी हितगुज केले.

प्रा. ईश्वर मुंडे हे अगदी सामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसाधारण ऊसतोड कामगाराच्या मुलाला शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभेला संधी दिल्यास निश्चितच त्यांना मताधिक्य मिळण्याची चर्चा मतदारात आहे. खऱ्या अर्थाने प्रा. ईश्वर मुंडे यांनी निवडणुकीची तुतारी फुंकून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
————————————————

Post Views: 123

Related Posts

भाजपाने बीड लोकसभेसाठी माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नावाची केली घोषणा

March 13, 2024

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्यासाठी गराडा घालून घोषणाबाजी

May 2, 2023

बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी बीड जिल्हाप्रमुख पदी डॉ.सौ.अंजलीताई घाडगे यांची निवड

January 23, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 5 9 9 1
Total Users : 145991
Views Today : 4

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.