बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी बीड जिल्हाप्रमुख पदी डॉ.सौ.अंजलीताई घाडगे यांची निवड
केज-
केज मतदारसंघाच्या नेत्या डॉ.अंजली घाडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी (दि.२२) सायंकाळी जाहीर प्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे उपस्थित होते.केज मतदारसंघाच्या नेत्या डॉ.अंजली घाडगे ह्या उच्चशिक्षित असून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून विधानसभा लढविली होती.त्यानंतर त्यांनी ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला होता.
त्यानंतर त्यांनी आता सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. प्रवेश करताच त्यांच्यावर महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देत मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्कार केला.यावेळी त्यांच्यासमवेत पंचायत समितीचे माजी सदस्य सय्यद नवाब इमामसाहेब, माजी उपसभापती दादासाहेब ससाणे,शिवसेनेचे माजी तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण भांडवलकर,ग्रामपंचायत सदस्य रतन ससाणे, अरुण करपे,वैजनाथ गायकवाड, प्रवीण भांडवलकर, जयराम बचुटे, तुळशीराम सूर्यवंशी,अविनाश ससाणे,शिवाजी गायकवाड,अजय जोगदंड,गोरख थोरात, खरेदी विक्री संघाचे संचालक सय्यद जुबेर, साळेगाव सेवा सोसायटीचे चेअरमन धोंडीराम इंगळे यांच्यासह इतरांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण संपूर्ण शक्तीनिशी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढवून संघटन मजबूत करावे, असे सांगत शुभेच्छा दिल्या.सदर झालेल्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
