राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्यासाठी गराडा घालून घोषणाबाजी
मुंबई-
जेष्ठ नेते शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, माणसाने कुठे तरी थांबले पाहिजे असे म्हणत आपण अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. असे म्हटले. त्यानंतर उपस्थित नेते व कार्यकर्ते यांना धक्का बसला, त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते व न्यात्यांनी त्यांना गराडा घालून घोषणा देत हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर त्यांनी एक समस्ती स्थापन करून जो निर्णय घेण्यात येईल त्यावर आपण विचार करू असे मत मांडले या कार्यक्रमाला उपस्थित नेतेमंडळींनी शरद पवार यांची निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली आहे तर काही नेत्यांचे चेहरे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. उपस्थित कार्यकर्त्यांना अजितदादा पवार व सुप्रिया सुळे यांनी शांत बसण्याचे आवाहन केले
