केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :
मात्र कुणीही जखमी नाही
गौतम बचुटे/केज :- केज येथील केजडी नदीच्या अर्धवट काम सुरू असलेल्या पुलावर अवघ्या पाच मिनिटात दोन टिप्पर हे दोन वेगवेगळ्या कारला धडकून अपघात झाला मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही.
रविचार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ :२१ वा. हायवा टिप्पर क्र. (एम एच-४४/ए ए-३८४४) ने ‘पोलीस’ असा समोर बोर्ड असलेल्या सुझुकी कार क्र. (एम एच-२०/एफ वाय-३१८५) ला मागून धडक दिली. त्या नंतर दुपारी १२:२६ वा. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने त्याच ठिकाणी पुन्हा दुसऱ्या एका विना नंबर प्लेटच्या हायवा टिप्परने क्र. (एम एच १४/ जी डी ०५८५) ला धडकली दिली. मात्र या दोन्ही अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
दरम्यान केजडी पुलाच्या रखडलेल्या पुलाच्या कामामुळे अपघात घडत असून काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.