Close Menu
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
  • Home
  • आंदोलन
  • Viral
  • अपघात
  • कृषी
  • गुन्हेगारी
  • चालू घडामोडी
  • जागतिकीकरण
  • समाजकारण
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • स्पेशल कवरेज
  • हेडलाईन
  • इतर
    • धार्मिक
    • निवडणूक
    • क्रिडा
    • कला
    • फोटो गॅलरी
    • घटना
    • भविष्य
    • सुपरवुमन
    • व्यापार
    • सिनेमा
    • सिटीझन रिपोर्टर
    • शैक्षणिक
    • संपादकीय
Facebook X (Twitter) Instagram
Vijayvarta
अपघात

केज येथे भीषण अपघात ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले एक जागीच ठार तर एक जखमी

By February 23, 2024No Comments2 Mins Read

केज येथे भीषण अपघात

ऑइलच्या टँकरने दुचाकीस्वारास चिरडले

एक जागीच ठार तर एक जखमी

मयताच्या डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडून मेंदू रस्त्यावर

गौतम बचुटे/केज :- केज येथे केज मांजरसुंबा रोडवर शिक्षक कॉलनी जवळ असलेल्या हॉटेल मधूबन जवळ मोटार सायकल स्वाराला एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑईलच्या टँकरने चिरडले. त्यात मोटार सायकल स्वाराच्या डोक्यावरून टँकर गेल्याने डोक्याच्या ठिकऱ्या उडून त्याचा मेंदू रस्त्यावर विखरून जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण जखमी झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, शुक्रवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:०० च्या सुमारास उमरी येथील राजाभाऊ श्रीपती भैरट आणि नरसिंग भैरट हे दोघे बाजार करून मोटार सायकल क्र. (एम एच/४४/पी-७४५३) वरून गावाकडे जात असताना केज मांजरसुंबा रोडवर असललेल्या शिक्षक कॉलनी जवळच्या हॉटेल मधूबन समोर बीडकडून केजच्या दिशेने येत असलेल्या एका भरधाव वेगातील ऑइलच्या टँकर क्र (एम एच ४४यु ९४४४)ने त्यांना चिरडले. त्या अपघातात राजाभाऊ भैरट यांच्या डोक्या वरुन टँकर गेल्याने त्यांच्या डोक्याच्या चिंधड्या उडून मेंदू रस्त्यावर विखुरला गेला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नरसिंग भैरट हे जखमी झाले आहेत. नरसिंग भैरट या जखमीला घेऊन अम्ब्युलन्स चालक बारगजे यांनी त्यांना स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि महिला पोलीस जमादार रुक्मिण पाचपिंडे, पोलीस जमादार त्रिंबक सोपणे आणि वाहन चालक दराडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अपघातातील टँकर ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणला आहे

Post Views: 187

Related Posts

केज येथील प्रसिद्ध यशवंत धाबा मालकाचा अपघाती मृत्यू; तर बार मालक व एक जण जखमी मोटारसायकलवरुन येरमाळा ते केज कडे येत असताना पहाटे झाला अपघात

May 1, 2024

केजडी पुलावर पाच मिनिटात दोन अपघात :

February 25, 2024

तीन बालके खदानीत बुडाली केज शहरातील घटना

October 14, 2023
Leave A Reply Cancel Reply

Weather Widget INDIA WEATHER

Our Visitor

1 4 9 3 3 8
Total Users : 149338
Views Today : 9

  • Home
  • Contact us
  • About us
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.