साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कांस्यपदक
केज प्रतिनिधी – दिनांक 29 30 31 जानेवारी 2024 रोजी छत्तीसगड बकेरो या ठिकाणी
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा पार पडल्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षे वयोगट मुलींच्या संघात साने गुरुजी निवासी विद्यालयांच्या दोन विद्यार्थिनी तर मुलांच्या संघात एक विद्यार्थी यांची निवड झालेली होती. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास व मुलांच्या संघास विजय प्राप्त झाला आहे.या दोन्ही संघास कास्यपदक प्राप्त झाले असून या संघात साने गुरुजी निवासी विद्यालयाची कु.रत्नमाला चौरे.कु शामल चौरे.चि. विष्णू आंधळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशामुळे संघातील सर्व विद्यार्थ्यांना व या तिन्ही विद्यार्थ्यांना शासकीय सेवेच्या वर्ग दोन पदाकरिता आरक्षणास पात्र ठरलेले आहेत त्यांच्या या यशाबद्दल त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या साने गुरुजी संकुलाच्या प्राचार्य डॉक्टर कविता कराड क्रीडा शिक्षक श्री सानप सर, श्रीमती कांदे मॅडम. श्री घुले सर. श्री तरकसे सर. सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष उद्धव कराड, उपाध्यक्ष राजेश कापसे तसेच साय्यक आयुक्त समाज कल्याण बीड श्री रवींद्रजी शिंदे साहेब, निरीक्षक श्री बारगजे सर. जिल्हा क्रीडा अधिकारी जालना श्री विद्यागर सर. जिल्हा क्रीडा अधिकारी बीड श्री पंडित चव्हाण सर. माजी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवासिनी देशमुख मॅडम. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या या यशाबद्दल व साने गुरुजी विद्यालयाचे नाव महाराष्ट्रात आणि देशपातळीवर गाजवल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे
