केज येथे खेळाडूंसाठी क्रीडांगण भेट
स्व.शिवाजीराव रामराव पाटील यांच्या स्मरणार्थ रणजितसिंह पाटील यांचा स्तुत्य निर्णय

केज-
रणजितसिंह पाटील उर्फ बहादुर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केज येथील युवक, खेळाडूंना स्व.शिवाजीराव रामराव पाटील यांच्या नावाने कानडी रोड केज येथे क्रीडांगणाची सुविधा खेळाडूंना भेट म्हणून देण्याचा कौतुकास्पद निर्णय मा. रणजितसिंह पाटील यांनी घेतला आहे. क्रीडांगणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच काम पूर्ण होऊन खेळाडूंना खेळण्यासाठी हे मैदान मिळणार आहे.
केज येथे आज घडीला तरी खेळाडूंना हक्काचे मैदान उपलब्ध नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे केज येथे क्रिडा स्पर्धा होत नसल्यामुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही.
राजकीय नेते मात्र आश्वशनापलीकडे काहीही करत नसल्याने युवा खेळाडूं कडून नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.
मात्र रणजितसिंह पाटील यांनी घेतलेल्या या स्तुत्य निर्णयामुळे खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. विविध स्पर्धा येथे भरवल्या जाऊ शकतात. खेळाडूंना हक्काचे मैदान मिळणार आहे. या निर्णयामुळे शहरातील सर्व खेळाडू,नागरीक व त्यांच्या मित्र परिवाराने रणजितसिंह पाटील व त्यांच्या कुटुंबाचे अभिनंदन केले आहे.
