बीडच्या सचिन संजय धस याची भारतीय क्रिकेट संघात निवड
सचिनचे कुटुंब केज तालुक्यातील रहवाशी
केज-
एकोणीस वर्षाखालील दुबई येथे आयोजित आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी बीडच्या सचिन संजय धस याची भारतीय संघात निवड झाली आहे, नुकत्याच झालेल्या चॅलेंजर क्रिकेट स्पर्धेत त्याने दोन शतकांसह मोठी धावसंख्या उभारली,त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे,सचिनने या आधी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. सचिनचे कुटुंब हे मुळचे केज तालुक्यातील सांगवी येथील आहे. सध्या ते बीड येथे राहतात सचिनचे वडील बीड येथील शासकीय रुग्णालयात एम पी डब्ल्यू पदावर कार्यरत आहेत तर आई सौ. सुरेखा धस या पोलीस खात्यात नोकरी करत आहेत.
बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशने सचिनच्या निवडीचे स्वागत केले असून सर्व बीड जिल्ह्यात केज तालुक्यातून क्रिकेट प्रेमीकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
