सावंतवाडी, कोरेगाव दरम्यान अपघात;
दुचाकीस्वार गंभीर जखमी
केज-
आज दुपारी १ च्या सुमारास एक दुचाकीस्वार केज- बीड रोडवरील सावंतवाडी, कोरेगाव दरम्यान रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत काही नागरिकांना दिसला. त्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला ठेवून १०८ वर फोन करून रुग्णवाहिका बोलावून त्यास केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सदरील व्यक्तीचे नाव बाबासाहेब हजारे रा. कासारी अशी माहिती मिळाली आहे. मात्र हा अपघात कसा झाला हे समजू शकले नाही.
